मनोज कुमार ते अजय देवगण, 'या' अभिनेत्यांनी भगतसिंह यांची भूमिका पडद्यावर गाजवली

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 28 September 2020

भगतसिंह यांच्यावर बॉलीवूडमध्ये अनेक सिनेमे बनवले गेले. यामध्ये अनेक कलाकारांनी त्यांची भूमिका पडद्यावर गाजवली.

मुंबई- शहीद भगत सिंह यांची आज २८ सप्टेंबर रोजी जयंती. भगतसिंह यांनी त्यांच्या विचारधारेने आणि हेतूने इंग्रजांच्या हुकुमशाहीला उलथवून टाकलं आणि तरुणांमध्ये क्रांतीची लाट आणली. भगतसिंह यांच्यावर बॉलीवूडमध्ये अनेक सिनेमे बनवले गेले. यामध्ये अनेक कलाकारांनी त्यांची भूमिका पडद्यावर गाजवली. भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्त त्या अभिनेत्यांविषयी जाणून घेऊया ज्यांनी भगतसिंह यांची भूमिका साकारत सगळ्यांची वाहवा मिळवली.   

हे ही वाचा: ड्रग्स प्रकरणात नाव आल्याने सैफ अली खान आणि साराच्या नात्यात आला दुरावा?​

शम्मी कपूर:

१९६३ मध्ये 'शहीद ए आजम भगतसिंह' या सिनेमात प्रसिद्ध अभिनेता शम्मी कपूर यांनी भगतसिंह यांची भूमिका साकारली होती. या सिनेमात शम्मी कपूर यांच्यासोबत प्रेमनाथ, उल्हास आणि अचला सचदेव मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाचं दिग्दर्शन के एन बंसल यांनी केलं होतं. 

मनोज कुमार:

भारत कुमार या नावाने प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांनी त्यांच्या यशस्वी सिनेकारकिर्दीत अनेक देशभक्तीपर सिनेमे केले. १९६५ मध्ये 'शहीद' या सिनेमात मनोज कुमार यांनी भगतसिंहची मुख्य भूमिका साकारली होती. 

सोनू सूद:

अभिनेता सोनू सूद देखील २००२ मध्ये रिलीज झालेल्या 'शहीद ए आजम' सिनेमात शहीद भगतसिंह यांच्या भूमिकेत दिसून आला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन सुकुमार नायर यांनी केलं होतं.

अजय देवगण:

'द लीजंट ऑफ भगत सिंह' या सिनेमात अजय देवगण भगतसिंह यांच्या भूमिकेत होता. हा सिनेमा २००२ मध्ये रिलीज झाला होता. या वर्षात भगतसिंह यांच्यावर तीन सिनेमे आले होते. मात्र प्रेक्षकांनी 'द लीजंट ऑफ भगतसिंह' मधील अजय देवगणच्या भूमिकेवर जास्त प्रेम केलं. या सिनेमासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 

सिद्धार्थ:

२००६ मध्ये आलेल्या 'रंग दे बसंती' सिनेमात आमीर खान चंद्रशेखर आझाद यांच्या भूमिकेत दिसून आला  तर भगतसिंह यांची भूमिका सिद्धार्थने साकारली होती. हा सिनेमा त्यावर्षीचा हिट सिनेमा होता.  

bhagat singh birth anniversary these actors played shaheed e azam role in films  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhagat singh birth anniversary these actors played shaheed e azam role in films