भाग्यश्रीची मुलगी सिनेमात येतेय कळलं का? हुमा कुरेशीसोबत दिसणार Avantika Dassani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagyashree,Daughter Avantika & Huma Qureshi

भाग्यश्रीची मुलगी सिनेमात येतेय कळलं का? हुमा कुरेशीसोबत दिसणार

(Salman Khan)सलमान खानसोबत 'मैने प्यार किया' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या भाग्यश्रीची(Bhagyashree) मुलगी अवंतिका दसानी आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत आहे. अवंतिका 'Zee5' वरील 'मिथ्या' या वेबसीरिज मधून डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाच्या कारकिर्दिला सुरुवात करीत आहे. या सीरिजमध्ये अवंतिका हुमा कुरेशीसोबत(Huma Qureshi) काम करताना आपल्याला दिसणार आहे. हुमासोबत तिचाही लीड रोल आहे. सीरिजचा फर्स्ट लूक पोस्टरच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला आहे,ज्या पोस्टरवर हुमासोबत अवंतिकाही दिसत आहे.

या वेब सीरिजचं दिग्दर्शन रोहन सिप्पी यांनी केलं आहे तर निर्मिती अप्लॉज एंटरटेनमेंटची आहे. ही सीरिज ६ भागांची आहे. हुमा आणि अवंतिकासोबत या सीरिजमध्ये परमब्रत चटर्जी,रजित कपूर आणि समीर सोनी महत्त्वाच्या व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहेत. यात हुमा हिंदी विषयाच्या प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अवंतिका तिची विद्यार्थीनी दाखविण्यात आली आहे. थ्रील आणि सस्पेन्सनी भारलेली ही सीरिज बऱ्याच अंशी क्लासरुम ड्रामा असल्याचं बोललं जात आहे. हुमा कुरेशीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या सिनेमाचं पोस्टर शेअर करीत खूप इंट्रेस्टिंग कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा: श्वेता तिवारीच्या अडचणी वाढल्या;अखेर एफआयआर दाखल

'मिथ्या' ही २०१९ मध्ये आलेल्या इंग्लिश वेब सीरिज 'चीट' चा रीमेक असल्याचं बोललं जात आहे. त्या सीरिजमध्ये केली,मौली विंडसर,टॉम गुडमैन-हिल यांच्या मुख्य भूमिका होत्या. अवंतिकाचं या सीरिजच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण होत असल्याने भाग्यश्रीची मुलगी म्हणूनही तिच्याकडून अनेकांच्या अपेक्षा आहेत. आईचा पहिलाच सिनेमा सुपरहिट होता,त्यातनं आईही अनेक पारितोषिकांची मानकरी ठरलेली आता अवंतिका भाग्यश्रीच्या पावलावर पाऊल ठेवून सर्वांच्या अपेक्षांना खरी उतरते का ते लवकरच कळेल. फक्त हुमा कुरेशीच्या अभिनयापुढे अवंतिकाही उजवी ठरो या शुभेच्छा.

Web Title: Bhagyashrees Daughter Avantika Dassani All Set To Make Her Acting Debut With Rohan Sippys Mithya Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top