प्रसिध्द भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन; वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 22 January 2021

नरेंद्र चंचल यांनी त्यांच्या अनोख्या शैलीच्या गायकीनं सर्वांच्या हद्यात स्थान मिळवले होते. त्यांची अनेक भजनं श्रोत्यांच्या मुखी होती.

मुंबई - आपल्या भजन गायनानं श्रोत्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणा-या प्रसिध्द भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 80 व्य़ा वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. प्रख्यात गायक दलेर मेंहदी आणि भारताचा खेळाडू  हरभजन सिंग यांनी त्यांना सोशल मीडियावरुन श्रध्दांजली वाहिली आहे. श्वासोश्वास घेण्यास अडथळा येत असल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

अचानक छातीत दुखू लागल्यानं त्यांनी गुरुवारी रात्री दिल्लीतील एका रुगणालयात दाखल करण्यात आले होते. पंजाब केसरी या यांच्या रिपोर्टनुसार त्यांनी अपोलो रुग्णालयात दुपारी 12 वाजता अखेरचा श्वास घेतला. ते मागील तीन महिन्य़ांपासून श्वासोश्वासाच्या त्रासानं त्रस्त झाले होते. त्यांनी त्यावर उपचार घेण्यास सुरुवातही केली होती. मात्र त्यांच्या प्रकृतीनं त्यांना फार साथ दिली नाही. नरेंद्र चंचल यांनी त्यांच्या अनोख्या शैलीच्या गायकीनं सर्वांच्या हद्यात स्थान मिळवले होते. त्यांची अनेक भजनं श्रोत्यांच्या मुखी होती. त्यातील एक अतिशय प्रसिध्द म्हणजे चलो बुलावा आया है, माताने बुलाया है हे भजन, याशिवाय प्यारा सजा है हे भजनही त्यांचे कमालीचे लोकप्रिय झाले होते.

चंचल हे त्यांच्या लाईव्ह परफॉ़र्मन्ससाठीही प्रसिध्द होते. त्यांचे जागरणाचे कार्यक्रम मोठ्या संख्येने होत असत. त्याला मिळणारा प्रतिसादही प्रचंड होता.त्यांच्या निधनानंतर कलाविश्वामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गायक दलेर मेहेंदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे नरेंद्र यांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. ‘गायक नरेंद्र चंचल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला प्रचंड दु:ख झाले’ असे ट्वीट केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना व्हायरसवर एक गाणे व्हायरल झाले होते.

नरेंद्र यांचे बॉलिवूड करिअर हे अभिनेते ऋषि कपूर यांच्यासोबत सुरु झाले होते. त्यांनी ‘बॉबी’ चित्रपटातील ‘बेशक मंदिर मस्जिद तोडो’ हे गाणे गायले होते. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमधील गाणी गायली आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhajan singer Narendra Chanchal dies at 80