Bharat Jadhav: एकेकाळी त्यांच्या मागे कोरसला उभा होतो अन् आज.. भरतने सांगितल्या शाहीर साबळे यांच्या खास आठवणी..

'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटात भरत जाधव जाधवची खास एंट्री..
Bharat Jadhav shared memory about maharashtra shaheer sable lokdhara his journey chorus to actor
Bharat Jadhav shared memory about maharashtra shaheer sable lokdhara his journey chorus to actor sakal
Updated on

Bharat Jadhav: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमाची सगळ्यांना उत्सुकता आहे. अंकुश चौधरी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे.

सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला अनेक दिग्गजांच्या भेटी होणार आहेत. अनेक कलाकारांनी या सिनेमात काम केलं आहे.

त्यापैकीच एक म्हणजे भरत जाधव. या निमित्ताने भरत जाधवने आपल्या काही खास आठवणी शेयर केल्या आहेत. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

(Bharat Jadhav shared memory about maharashtra shaheer sable lokdhara his journey chorus to actor)

Bharat Jadhav shared memory about maharashtra shaheer sable lokdhara his journey chorus to actor
Onkar Bhojane: शिवाजी मंदिरशी ओंकार भोजनेचं आहे खास कनेक्शन, सांगितला भावनिक किस्सा..

भरत जाधव, केदार शिंदे आणि अंकुश चौधरी ही जोडी सर्वांनाच ठाऊक आहे. या तिघांनीही महाविद्यालयातून बाहेर पडताच शाहीर साबळे यांच्या पार्टीत सहभाग घेतला. नाटकासोबतच त्यांनी ''महाराष्ट्राची लोकधारा'' मध्ये काम केले. खरतर हीच त्यांच्या यशाची पहिली पायरी होती.

आज 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाच्या निमित्ताने हे तिघे पुन्हा एकत्र आले आहेत. अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत आहे तर केदार शिंदे यांनी दिग्दर्शक केले आहे. विशेष म्हणजे भरत जाधवही या सिनेमात एका छोट्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच त्यांनी शाहीर साबळे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भरत म्हणाला, ''शाहीर साबळे हे आमच्यासाठी नेहमीच आदर्श व्यक्तिमत्व आहे. आमची सुरुवातच शाहीर साबळे आणि पार्टीतून झाली. तु कुठे काम करतो.. यावर शाहीर साबळे हे उत्तर ऐकताच घरचेही निर्धास्त असायचे. आम्ही आमच्या आजोबांना कधी पाहिलं नाही पण तेच आमच्यासाठी आमचे आजोबा होते. मी त्यांच्या छत्रछायेखाली वाढलो आहे. त्यांच्या मागे कोरसला उभं राहून मी सुरुवात केली आहे. आज मी जे काही आहे ते केवळ शाहीर साबळे आणि त्यांच्या कुटुंबामुळे आहे.''

''त्यांचा संघर्ष मोठा आहे. अगदी आम्हालाही तो उशिरा उमगत गेला. एक सामान्य शाहीर ते महाराष्ट्र शाहीर हा प्रवास खूप मोठा आणि खडतर होता. पद्मश्री मिळणं इतकं सोप्पं नव्हतं. आज त्यांचा जीवनपट येतोय याचा खूप आनंद आहे. त्यात आपल्याला काम करता यावं एवढीच इच्छा होती, या चित्रपटात मला छोटी भूमिका करता आली याचे मला खूप समाधान आहे. हा मला माझा चित्रपट वाटतो, तो तुम्हालाही वाटेल.'' अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com