'आम्ही मामा कधी होणार?'; फोटोग्राफरच्या प्रश्नावर भारतीचं भन्नाट उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'आम्ही मामा कधी होणार?'; फोटोग्राफरच्या प्रश्नावर भारतीचं भन्नाट उत्तर

'आम्ही मामा कधी होणार?'; फोटोग्राफरच्या प्रश्नावर भारतीचं भन्नाट उत्तर

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (bharti singh) तिच्या हटके अंदाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. सध्या ती पती हर्ष लिंबाचियासोबत (Haarsh Limbachiyaa) 'डान्स दिवाने' या शोचे सुत्रसंचालन करत आहे. या शोच्या स्पर्धकांसोबत धमाल, मस्ती करतानाचे व्हीडियो आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. शोच्या शूटिंग दरम्यान भारती फोटोग्राफर्ससोबत संवाद साधत असते. नुकतंच एका फोटोग्राफरने भारतीला हटके प्रश्न विचारला. या प्रश्नाला तिने दिलेल्या भन्नाट उत्तराने अनेकांचे लक्ष वेधले.

हेही वाचा: नीतू कपूर यांनी हॉटेलमध्ये फोडल्या प्लेट्स; व्हिडीओ व्हायरल

डान्स दिवानेच्या सेटवरील एका फोटोग्राफरने 'आम्ही मामा कधी होणार? काही गुड न्यूज आहे का?', असा प्रश्न विचारला. यावर भारतीने उत्तर दिले, 'सर्वांनाच बाळाची प्रतीक्षा आहे. पण तुम्ही आम्हाला जरा एकटं सोडा' भारतीच्या या उत्तराने तेथील सर्व फोटोग्राफर्सना हसू आवरले नाही.

हेही वाचा: भन्साळींच्या चित्रपटातून सोनम कपूरची हकालपट्टी? जाणून घ्या सत्य

2017 मध्ये भारती आणि हर्ष लग्नबंधनात अडकले. काही दिवसांपूर्वी भारती तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली होती. कोरोनाच्या काळात आपल्याला बेबी प्लॅनिंग करायचे नाही, कोरोनात ते जास्त धोकादायक आहे, असे तिनं म्हटलं होत. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.