भन्साळींच्या चित्रपटातून सोनम कपूरची हकालपट्टी? जाणून घ्या सत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भन्साळींच्या चित्रपटातून सोनम कपूरची हकालपट्टी? जाणून घ्या सत्य

भन्साळींच्या चित्रपटातून सोनम कपूरची हकालपट्टी? जाणून घ्या सत्य

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. त्यांच्या पद्मावत, बाजीराव मस्तानी आणि रामलीला या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. भन्साळी यांनी अनेक कलाकरांना त्यांच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली आहे. अभिनेत्री सोनम कपूरला (Sonam Kapoor) देखील संजय यांनी त्यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी दिली होती. आता भन्साळी यांच्या आगामी चित्रपटामध्ये देखील अभिनेत्री सोनम कपूर ही प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी सोनम ही संजय यांच्या ऑफिसमध्ये दिसली होती. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये संजय लीला भन्साळी यांनी सोनमसोबतच्या भेटीबाबत खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोण, रणबीर कपूर आणि कार्तिक आर्यन या कलाकरांनी संजय भन्साळी यांच्या ऑफिसमध्ये हजेरी लावली होती. तसेच सोनम देखील संजय यांच्या ऑफिसमध्ये गेली होती. तेव्हापासून संजय यांच्या आगामी चित्रपटामध्ये सोनम काम करणार असल्याची चर्चा सुरू झाली. एका मुलाखतीमध्ये संजय यांनी सांगितले, 'अनेक कलाकार मला भेटायला येतात. आम्ही गप्पा मारतो. आम्ही भेटत आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही एकत्र काम करत आहोत.'

हेही वाचा: 'थोडी तरी लाज बाळगा'; प्रियांका-निकच्या फोटोवर नेटकरी भडकले

हेही वाचा: Kota Factory 2 teaser: प्रेक्षकांचा लाडका 'जीतू भैय्या' परत येतोय..

सोनमने संजय लीला भन्साळी यांच्या 'ब्लॅक' या चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. सोनमचा लवकरच ‘ब्लाइंड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शोम मखीजा या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात सोनम एका अंध व्यक्तीची भूमिका साकारणार आहे.. हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा रिमेक असणार आहे. वीरे दी वेडिंग, नीरजा, प्रेम रतन धन पायो या चित्रपटांमधील सोनमच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.