Bharti Singh: भारती सिंगचा सासरा उर्फीच्या प्रेमात.. सुनेनंच केली पोलखोल.. भन्नाट व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharti Singh shared video about his father in law and urfi javed connection

Bharti Singh: भारती सिंगचा सासरा उर्फीच्या प्रेमात.. सुनेनंच केली पोलखोल.. भन्नाट व्हिडिओ व्हायरल

Tv Entertainment News: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये आपल्या प्रभावी सादरीकरणामुळे भारती सिंग ही नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिनं वेगवेगळ्या (Social media Viral video) कॉमेडी शो मधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या भारती ही तिचा मुलगा गोलू उर्फ लक्ष्यमुळे चर्चेत असते.

तिचा मुलगा आता सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याच्या व्हिडिओही नेटकऱ्यांना प्रचंड आवडत असतात. आज असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, पण आज गोलू ऐवजी चक्क सासऱ्याचा व्हिडिओ शेयर केला आहे.

भारती सिंगने एक व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यामध्ये भारती आपल्या सासऱ्यासोबत एकदम गमतीशीर गप्पा मारत आहे. आणि विषय, उर्फी जावेद..

(Bharti Singh shared video about his father in law and urfi javed connection)

अभिनेत्री भारती सिंगच्या फॅन पेज वरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये भारती ाआणि भारतीचे सासू सासरे घरामध्ये बसले आहेत. भारती एखाद्याची खिल्ली उडवण्यामध्ये किती माहेर आहे हे आपल्यालं ठाऊक आहेच.

तिच्यापुढे कुणाचाही निभाव लागत नाही. पण चक्क तिने सासऱ्यांचीच टर उडवली आहे. तिच्या सासऱ्यांना म्हणजे हर्षच्या वडिलांना तिने उर्फीचं नाव घेऊन सळो की पळो केलं आहे. या व्हिडिओ पाहून चाहतेही वेडे झाले आहेत.

भारती सिंग आपल्या चाहत्यांना सांगत आहे की, ''आताच मी आणि माझे सासरे आमच्या एका शो विषयी बोलत होतो. ज्यामध्ये उर्फी देखील आली होती. तर माझे सासरे कार्यक्रमाची कमी उर्फीचीच चौकशी जास्त करत आहेत.'

'ती आली का.. ती उठली का.. बसली का.. सारखी तिचीच चौकशी.. एवढं वाटतं तर सांगा.. ती आवडते म्हणून.. तुम्ही तिचे फॅन आहात म्हणून..'

त्यावर तिचे सासरे म्हणतात, नाही असं काही नाहीय, मी सौरवची चौकशी करत होतो..'

मग भारती थेट सासूलाच विचरते, 'तर सासूही म्हणते.. हो हे उर्फीची चौकशी करत होते..सारखं तिच्या विषयीच बोलत होते'

त्यावर सासरे म्हणतात, नाही असं नाही काही..

पण ऐकेल ती भारती कसली.. 'भारती म्हणजे बाजूला बायको आहे म्हणून घाबरू नका.. तुम्ही तिला सोशल मीडियावर फॉलो देखील करता.. आवडते तर आवडते म्हणा की'

मग शेवटी न राहून तिचे सासरे म्हणतात, 'तसं नाहीय.. मी तिचा आदर करतो.. तिचे विचार मला आवडतात..' हा जबरदस्त व्हिडिओ पाहून सगळे जोरदार हसले आहेत.