लॉकडाऊनमध्ये भाऊ कदम-अशोक सराफ ही विनोदवीरांची जोडी प्रेक्षकांमध्ये हशा पिकवण्यासाठी सज्ज

bhau
bhau

मुंबई- झी टॉकीज वर सुरू असलेल्या 'टॉकीज प्रीमियर लीग'मध्ये प्रेक्षकांनी मागील रविवारी 'तुंबाड', 'बोला अलख निरंजन' आणि 'हंपी' या  चित्रपटांचा आस्वाद   घेतला. आता या रविवारी म्हणजेच २६ एप्रिल २०२० रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी झी टॉकीज ओरिजिनल्स घेऊन येत आहे एक हॉरर कॉमेडी चित्रपट 'आलटून पालटून' .. 'आलटून पालटून' हा एक भन्नाट  हॉरर कॉमेडी चित्रपट असून यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके विनोदी अभिनेते अशोक मामा म्हणजेच अशोक सराफ व भाऊ कदम यांची जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळणार आहे.. हा चित्रपट पहिल्यांदाच झी टॉकीज आपल्या  प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत असून हॉरर आणि कॉमेडी या दोन्हींचा मिलाप असणारा हा चित्रपट आहे..

मराठी चित्रपटांमध्ये आपल्याला हॉरर कॉमेडी क्वचितच बघायला मिळते. त्यापैकीच एक असलेल्या 'आलटून पालटून' चित्रपटातून प्रेक्षकांना नक्कीच काही तरी नवीन  बघायला मिळेल. अशोक सराफ आणि भाऊ कदम या विनोदवीर जोडीने चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. त्यामुळे अशोक सराफ आणि भाऊ कदम ह्या दोन दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने चित्रपटाला चार चांद लावले आहेत असेच म्हणावे लागेल.

'आलटून पालटून' या चित्रपटात अशोक सराफ यांनी भाऊ कदम यांच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली आहे . चित्रपटाचे कथानक या दोन्ही भावांच्या भोवताली फिरते . हे दोघे भाऊ एका भुताटलेल्या घरात राहत असतात जे घर त्यांना एकदम स्वस्तात मिळालेले असते .. घरात  एक नाही तर ४ -४ भुतं आश्रयाला आहेत हे कळाल्यावर दोन्ही भावांची काय अवस्था होते हे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेल येत्या रविवारी म्हणजेच २६ एप्रिल २०२० रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता.

कोरोनाच्या संकटामुळे आपल्या सर्वांनाच घरात बसावं लागत आहे. याचं  काळात प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन व्हावं या उद्देशाने अनेक कार्यक्रम प्रेक्षकांसाठी पुन्हा दाखवले जात आहेत..  

bhau kadam and ashok saraf movie during lockdown  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com