Bhau Kadam च्या लेकीची चिंतेत टाकणारी पोस्ट व्हायरल, स्वतःला झालेल्या आजाराची माहिती देत म्हणाली..

भाऊ कदमची मोठी मुलगी मृणमयी कदम ही एक युट्युबर आहे,वडीलांप्रमाणेच सोशल मीडियावर तिचा तगडा चाहता वर्ग आहे.
Bhau Kadam with daughter Mrunmayee
Bhau Kadam with daughter Mrunmayee

Bhau Kadam Daughter Mrunmayee Kadam Post Viral: 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शो च्या माध्यमातून भाऊ कदम हे नाव आज केवळ महाराष्ट्रात नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलं आहे. तसं भाऊला पहिली ओळख मिळाली ती झी मराठी वरील 'फू बाई फू' या कॉमेडी शो मुळे. त्यानंतर मात्र भाऊनं मागे वळून पाहिलं नाही.

आज जगभरात भाऊचा चाहता वर्ग आहे. भाऊनं देखील शो पुरतं स्वतःला बांधून न ठेवता सिनेमा,नाटक या माध्यमातूनही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. आज सिनेमाचा मुख्य अभिनेता म्हणूनही भाऊ कदमची ओळख आहे. 'पांडू हवालदार' या सिनेमात तर त्यानं दस्तुखुद्द अप्सरेचा म्हणजे आपल्या सोनाली कुलकर्णीचा प्रियकर रंगवला आहे.

दोघांच्या भन्नाट केमिस्ट्रीनं सिनेमातील गाण्यांना एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवलं होतं. भाऊ सोशल मीडियावर देखील सक्रिय पहायला मिळतो. आणि तिथेही दिवसें दिवस त्याचा फॅन फॉलॉइंग वाढत जात आहे.

Bhau Kadam with daughter Mrunmayee
Jab We Met सिनेमातून रातोरात झालेला भूमिका चावलाचा पत्ता कट.. अनेक वर्षांनी खुलासा करत म्हणाली,'हे करीना-शाहिद तर..'
Bhau Kadam with daughter Mrunmayee
A R Rehman Viral Video: 'हिंदीत बोलू नकोस..', रहमान यांनी भर मंचावर पत्नीला टोकलं अन् मग पुढे जे घडलं ते केवळ कमाल..

भाऊप्रमाणेच त्याची मोठी मुलगी मृणमयी देखील तितकीच क्रिएटिव्ह आहे. अर्थात ती तिची क्रिएटिव्हिटी सोशल मीडियावर अधिक दाखवते त्यामुळे तिचाही तिथं चांगलाच दबदबा आहे. मृणमयी एक युट्युबर आहे आणि ती तिचे क्रिएटिव्ह व्हिडीओ शेअर करत असते.

मृणमयी मेकअप आणि फॅशन संबंधित व्हिडीओ शेअर करताना दिसते. पण मृणमयीच्या एका नुकत्याच केलेल्या पोस्टनं तिच्या चाहत्यांसोबत भाऊच्या चाहत्यांनाही चिंतेत टाकलं आहे. मृणमयीनं एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिच्या हाताला सलायन लावल्याचं दिसत आहे.

 Mrunmayee Kadam post
Mrunmayee Kadam postInstagram

मृणमयीनं आपल्या इन्स्टा स्टोरीत लिहिलं होतं, ''माझी परीक्षा सुरू होती. शेवटच्या दोन पेपरच्या वेळी अचानक माझ्या हातानं लेखन करणं जवळ जवळ सोडून दिलं. मलाही वाटलं की आता काही पेपर देता येणार नाहीत. तरिही मी प्रयत्न करत पेपर लिहिले. माझ्या अंगात ताकद नसताना. त्यातच मासिक पाळीचं असह्य दुखणं..पण हे सगळं सहन केलं''.

पुढे मृणमयी म्हणाली, ''फार काही गंभीर नाही फक्त व्हिटॅमिन आणि कॅल्शियम कमी झालंय शरीरातलं. बाकी मी बरी आहे''.

बरं एवढ्यावरच ती थांबली नाही तर तिनं पुढे लिहिलं आहे की,''आता फक्त व्हॉइस ओव्हर बाकी आहे,माझ्या मेकअप सीरिजच्या पुढच्या एपिसोडसाठी. आजच ५ ते ६ पोस्ट करत आहे''.

ही पोस्ट मृणमयीनं तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केली आहे. मृणमयीची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मृणमयी कदम ही केवळ २१ वर्षांची आहे.

Bhau Kadam with daughter Mrunmayee
Kumar Sanu च्या मुलीनं डिप्रेशनमुळे केलेला स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न.. शैनन सानू म्हणाली,'तो काळा दिवस..'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com