Manoj Tiwari: ५१व्या वर्षीय मनोज तिवारी तिसऱ्यांदा होणार बाबा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manoj Tiwari

Manoj Tiwari: ५१व्या वर्षीय मनोज तिवारी तिसऱ्यांदा होणार बाबा...

 भोजपुरीसह बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध असलेले अभिनेता, भोजपुरी गायक आणि राजकारणी भाजप खासदार मनोज तिवारी अनेकदा त्याच्या वक्तव्यामूळे चर्चेत असतात. मात्र सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. बातमीही तशीच आहे.  ते  वयाच्या 51 व्या वर्षी पुन्हा वडील होणार आहेत.

मनोज तिवारी यांची पत्नी सुरभी तिवारी ही लवकरच बाळाला जन्म देणार आहे. मनोज तिवारी यांच्याकडे बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पडला. या बेबी शॉवर पार्टीत मनोज आणि सुरभी तिवारी यांचे जवळचेच मित्र सहभागी होते. या पार्टीचा एक व्हिडिओ मनोज तिवारी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तिवारी हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते त्याच्या चाहत्यांसोबत नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांनी टाकलेल्या या व्हिडिओमध्ये मनोज तिवारी आणि त्यांची पत्नी पारंपरिक लूकमध्ये दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सुरभीने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. यासोबतच तिने दागिने घातले आहेत. व्हिडिओमध्ये सुरभी तिवारीचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. तिच्या या संपूर्ण लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

तर दुसरीकडे, मनोज तिवारी यांनी पेस्टल गुलाबी रंगाची शेरवानी घातली आहे. व्हिडिओमध्ये त्यांची मुलगी सान्विकाही गोड दिसतेय. हा व्हिडिओ शेअर करताना मनोज तिवारीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'काही आनंद आम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही... आम्ही ते फक्त अनुभवू शकतो..' मनोज तिवारी यांच्या पत्नीच्या बेबी शॉवरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्याच्या चाहत्यांसह मनोरंजन विश्वातील सर्वच कलाकार यांनी या व्हिडिओ लाइक तसेच कमेंट्सद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर त्यांनी सुरभी हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहेत. २०२० रोजी त्यांनी भोजपुरी गायिका सुरभीशी लग्न केले. सुरभी आणि मनोज यांना देखील एक मुलगी आहे. आता पुन्हा सुरभी बाळाची आई होणार आहे.

हेही वाचा: Big Boss 16: ‘या’ स्पर्धकांवर या आठवड्यात एलिमिनेशनची टांगती तलवार...