esakal | "तिनं दिलेल्या पाचशेच्या नोटीनं नट झालो"
sakal

बोलून बातमी शोधा

actor ravi kishan

"तिनं दिलेल्या पाचशेच्या नोटीनं नट झालो"

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - रवि किशन (ravi kishan) हा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. केवळ भोजपूरी (bhojpuri) नाहीतर बॉलीवूडमध्येही (bollywood) त्यानं आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. तो एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. त्याचा फॅनफॉलोअर्सही मोठा आहे. एका मध्यमवर्गीय कुटूंबातून आलेल्या रवि किशननं त्याच्या कुटूंबातील आठवणींना उजाळा दिला आहे. लहानपणापासून अभिनयाची आवड काही केल्या स्वस्थ बसु देत नव्हती. अशावेळी अभिनेता व्हायचं हे जेव्हा घरच्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी जे सुनावलं...ते अजूनही लक्षात असल्याचे रवि किशन सांगतो. (bhojpuri actor ravi kishan struggle story father not like acting know-about his life yst88)

रवि किशनला भोजपुरी सिनेमासृष्टीचा अमिताभ (amitabh bachchan) असं संबोधलं जातं. त्याच्या शब्दाला त्या इंडस्ट्रीमध्ये मोठा मान आहे. मात्र एक वेळ अशी होती की, त्याच्याकडे पैसे नव्हते आणि तो अभिनेता व्हायचं स्वप्न घेऊन मुंबईत आला होता. घरुन येताना केवळ पाचशे रुपये घेऊन तो या स्वप्ननगरीत आला होता. तेव्हापासून त्याचा संघर्षमय प्रवास सुरु झाला. आपल्याला काही झालं तरी मोठा अभिनेता व्हायचं. असा त्यानं निश्चय केला होता. अखेर त्यानं तो पूर्णही करुन दाखवला.

रवि आता प्रसिद्ध अभिनेता आणि बीजेपीचा खासदारही आहे. मात्र हा प्रवास त्याच्यासाठी काही सोपा नव्हता. त्याचे वडिल दुधाची डेअरी चालवायचे. त्यांना रविनं चित्रपट क्षेत्रापासून लांब राहावं. असं वाटायचं. त्यानं शेती करावी, आपल्या व्यवसायात मदत करावी हे त्यांनी त्याला बोलून दाखवलं आहे. रविचा जन्म मुंबईमध्ये झाला. जेव्हा त्याच्या वडिलांचा व्यवसाय बंद झाला तेव्हा हे कुटूंब जोनपूर या आपल्या गावी परतले.

हेही वाचा: 'माफ करा, तुम्ही जास्तच सडपातळ आहात', थट्टेनं छवीचा संताप

हेही वाचा: काय सांगता ती 'शहनाज गिल' आहे? तिचा 'अँटीक लूक' एकदा पाहाच

रवि किशन अमिताभ बच्चन यांना आदर्श मानतो. त्यांचा प्रत्येक चित्रपट त्यानं पाहिला आहे. तेव्हापासून आपणही त्यांच्याप्रमाणे मोठा अभिनेता व्हायचं हे स्वप्न त्यानं उराशी बाळगलं. वडिलांना त्यानं अभिनेता होणं हे मान्य नव्हतं. अनेकदा त्यानं त्यावरुन वडिलांचा मारही खाल्ला आहे. वयाच्या 17 व्या वर्षी त्यानं जोनपूर सोडलं आणि मुंबईत आला. त्यावेळी येताना आईकडून पाचशे रुपये आणले होते. रवि ती आठवण अजूनही सांगतो. आता तो भोजपूरी आणि बॉलीवूडमधील एक मोठा अभिनेता आहे. जागतिक विचारवंत ओशो यांच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये तो ओशोची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे.

loading image