esakal | 'माफ करा, तुम्ही जास्तच सडपातळ आहात', थट्टेनं छवीचा संताप
sakal

बोलून बातमी शोधा

actress chhavi mittal

'माफ करा, तुम्ही जास्तच सडपातळ आहात', थट्टेनं छवीचा संताप

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - ट्रोलर्स (trollers) कधी काय बोलतील याचा भरवसा नाही. ते नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चाहत्यांना नावं ठेवत असतात. सध्या कृष्णादासी फेम छवि मित्तल ही चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर (social media) ती चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तिला तिच्या दिसण्यावरुन ट्रोल करण्यात आलेले आहे. त्यामुळे ती संतापली आहे. ज्यांनी तिला ट्रोल केले आहे त्यांना तिनं परखड शब्दांत सुनावले आहे. याचीही चर्चा झाली आहे. आपल्या शरीरयष्टीवरुन ट्रोल करण्यात आले याचे जरा जास्तच वाईट असल्याचे छवीनं सांगितलं आहे. (Lets stop women body shaming women chhavi mittal yst88)

आपल्या चाहत्यांना अनेक गोष्टी शेयर करणाऱ्या छविनं ही गोष्टही शेयर केली आहे. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे. ती अरहम (arham) आणि अरीजा (arija) नावाच्या दोन मुलांची आई आहे. तिनं सध्या तिच्या सोशल मीडियाच्या एका अकाऊंटचा व्हिडिओही शेयर केला आहे. त्यात एका युझर्सनं तिच्या दुबळेपणाची थट्टा उडवली आहे. त्यावर छविनं एक पोस्ट शेयर करुन एक मोठी पोस्टही लिहिली आहे. छविनं लिहिलं आहे की, ज्यापध्दतीनं मला ट्रोल करण्यात आले ते चूकीचे आहे.

हेही वाचा: पॅरिसमधल्या रस्त्यावर 'प्रियाचा जलवा', नेटकऱ्यांकडून 'लाईक्सचा पाऊस'

कोणाला जाडं म्हणणं हे बॉडी शेमिंग या प्रकारातलं आहे. त्यामुळे कोणालाही अशाप्रकारे नावं ठेवू नये. मी जेव्हा त्या कमेंट वाचल्या तेव्हा मला धक्का बसला. लोकं अशाप्रकारे विचार करतात. त्यांना नेमकं काय हवं असतं. हेच कळत नाही. दुसऱ्यांना नावं ठेवणं हेच त्यांचे दिवसभरातील काम आहे. अर्थात काही कमेंट अशा आहेत की त्यावर विचार करण्याची गरज आहे. माफ करा, वाईट वाटून घेऊ नका. मात्र त्या व्हिडिओमध्ये तुम्ही फारच सडपातळ दिसता आहात. असं एका युझर्सनं छविला सांगतिले होते. त्यामुळे तिच्या रागाचा पारा वाढला.

loading image