धक्कादायक! युपीतील हॉटेलमध्ये प्रसिद्ध निर्मात्याचा संशयास्पद मृत्यू

युपीतील एका हॉटेलमध्ये प्रसिद्ध निर्मात्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना
Bhojpuri film director Subhash Chandra Tiwari found dead in hotel room in UP's Sonbhadra
Bhojpuri film director Subhash Chandra Tiwari found dead in hotel room in UP's Sonbhadra

फिल्म इंडस्ट्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काल अभिनेत्री वैभवी उपाध्याय तसेच हिंदी सिनेसृष्टी आणि मालिकेतले लोकप्रिय अभिनेते नितिश पांडे यांच्या निधन झाले. या दोघांच्या दुःखातून सावरत नाही तोवर युपीतील एका हॉटेलमध्ये प्रसिद्ध निर्मात्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Bhojpuri film director Subhash Chandra Tiwari found dead in hotel room in UP's Sonbhadra)

उत्तर प्रदेशातली रॉबर्ट्सगंज येथील एका हॉटेलात भोजपुरी निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष चंद्र तिवारी यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे. चित्रीकरण संपवून तिवारी हॉटेलात रात्री उशिरा आले होते. पण बराच वेळ झाला तरी त्यांनी हॉटेलचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांचा रुम उघडण्यात आला असता त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.(Latest Marathi News)

सुभाष चंद्र तिवारी हे वाराणसीचे रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. 'दो दिल बंधे एक डोरी से' या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने 11 मे पासून ते त्यांच्या 40 सदस्यांच्या टीमसोबत या हॉटेलमध्ये थांबले होते. सिंग यांनी सांगितले की, चित्रपटाचे शूटिंग मंगळवारीच संपले. यापूर्वी त्यांना छातीत दुखत होते, त्यामुळे त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.(Entertainment News in Marathi)

मनोज कुमार सिंग यांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी शूटिंग संपवून ते हॉटेलमध्ये परतले होते, मात्र बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला नाही, तेव्हा तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांनी हॉटेल मालकाला याची माहिती दिली.

हॉटेल मालकाने या प्रकरणाची माहिती रॉबर्टसगंज पोलीस ठाण्यात दिली. सिंग यांनी सांगितले की, पोलिसांनी दरवाजाचा भाग कापून दरवाजा उघडला तेव्हा त्यांना तिवारी यांचा मृतदेह बेडवर पडलेला दिसला.(Entertainment News in Marathi)

या प्रकरणाचा तपास सुरू असून शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे प्रभारी निरीक्षकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com