
Shilpi Raj: भोजपुरी सिनेइंडस्ट्रीची प्रसिद्ध गायिका शिल्पी राज हिच्या सोशल मीडियावरील पोस्टनी खळबळ उडवलीय. पोस्टमध्ये तिनं काही अशा गोष्टी लिहिल्या आहेत की सोशल मीडियावर नेटकऱ्यांना वाटलं की शिल्पी राजनं आत्महत्या केली आहे. तिच्या पोस्टनं चाहत्यांनाही हैराण करून सोडलं होतं. यासगळ्यामुळे सगळेच विचार करू लागले की असं अचानक काय झालं की शिल्पीच्या डोक्यात आत्महत्येचा विचार आला.(Bhojpuri Singer Shilpi Raj alleged suicide post goes viral clears was in work pressure)
पण आता शिल्पीनं स्वतः या सगळ्या प्रकरणावर वर बोलत त्याला पूर्णविराम दिला आहे. तिनं एका वृत्त वाहिनीशी बोलताना खुलासा केला आहे की,ती पोस्ट तिनं स्वतः लिहिली होती. पण तिचा आत्नहत्येचा कोणताच विचार नाही. शिल्पीनं त्या पोस्टमध्ये कामाच्या प्रचंड दडपणाविषयी लिहिलं होतं. पण शिल्पीनं हे स्पष्ट केलं की आता सगळं ठीक आहे.
भोजपुरी गायिका शिल्पी राज एका पोस्टमुळे रातोरात चर्चेत आली. शिल्पीनं आपल्या गाण्यामुळे अनेक लोकांना आपल्या फॅन लिस्ट मध्ये सामावून घेतलं आहे. अशामध्ये तिची निराशाजनक पोस्ट पाहून सगळेच हैराण झाले होते. प्रत्येकजण तिला हिम्मत देताना दिसला. शिल्पीनं लिहिलं होतं-''कोणतंच काम मी नीट नाही केलं. ना शिक्षण,ना संगीत. मी काय होते आणि मी काय झालेय. खरं सांगू तर आज मी एक कठपुतलीचं आयुष्य जगतेय. काहीच कळत नाहीय की मी काय करावं. आई एक तूच आहेस,जिनं आतापर्यंत मला थांबवून ठेवलं. पण आता या जगात रहायचं मन करत नाही. मला माफ कर''.
शिल्पीच्या या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला नुसता. लोकांना वाटलं गायिका आत्महत्या करणार आता. पण पोस्टनं वेगळंच वळण घेतल्यावर शिल्पीनं स्वतः खुलासा केला की आत्महत्येचा विचार करुन तिनं पोस्ट केली नव्हती. तिला फक्त मनातलं दुःखं बोलून दाखवायचं होतं. मी आता ठीक आहे, कामाच्या ताणामुळे मी ते लिहिलं होतं. पण आता सगळं ठीक आहे. शिल्पीनं आत्महत्येच्या बातम्यात तथ्य नसल्याचं सांगितलं.
शिल्पी या आधी तिच्या MMS Video मुळे देखील चर्चेत आली होती. तेव्हा तिनं कुणीतरी इंडस्ट्रीतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी हा डाव रचतोय असं कोणाचं नाव न घेता आरोप केला होता. आणि एमएमएस मध्ये आपण नाही असं स्पष्ट केलं होतं. शिल्पी राज युपीच्या देवरियामधली रहिवाशी आहे. तिनं खेसारी लाल यादव,पवन सिंग सारख्या सुपरस्टारसोबत काम केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.