
Bholaa Advance Booking Collection: भोलाने रिलीज होण्याच्या एक आठवडा आधी केली बंपर कमाई
दृश्यम 2 च्या यशानंतर आता अजय देवगण पुन्हा एकदा पडद्यावर परतण्याच्या तयारीत आहे. त्याचा 'भोला' चित्रपट 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज झाल्यापासून लोक तब्बू आणि अजय देवगण स्टारर चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत.
'भोला'च्या रिलीजला आता एक आठवडा बाकी आहे, पण लोकांमध्ये या अॅक्शन चित्रपटाची किती क्रेझ आहे, याचा अंदाज या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग आणि त्याची कमाई पाहूनच लावता येईल. इतकंच नाही तर सिनेमागृहेही जवळपास तुडुंब भरली आहेत.
खुद्द अजय देवगणही भोलाबाबत खूप उत्सुक आहे. या चित्रपटात तो केवळ अभिनय करत नाही, तर त्याने स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. अजय देवगणचा भोला हा तमिळ चित्रपट 'कैथी' चा हिंदी रिमेक आहे, जो OTT प्लॅटफॉर्मवर आधीच उपलब्ध आहे.
मात्र, चित्रपटाला ज्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय, ते पाहण्यासारखे आहे. बॉक्स ऑफिस वेबसाइटच्या एका अहवालानुसार, भोलाने अॅडव्हान्स बुकिंगमधून तीन दिवसांत सुमारे 1 कोटींची बंपर कमाई केली आहे.
भोलाच्या तिकिटांची ज्या पद्धतीने विक्री होत आहे, ते पाहता अजय देवगणचा चित्रपट पहिल्याच दिवशी डबल डिजिटसोबत ओपनिंग करू शकतो, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
रिपोर्ट्सनुसार, अजय देवगण आणि तब्बूच्या 'भोला' या चित्रपटाची 50 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. 2D सोबत हा चित्रपट 3D मध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये, 2D, 3D आणि 3D IMAX थिएटर्समधील भोलाचे सर्व शो जवळजवळ भरले आहेत आणि लोक पहिल्या दिवसाच्या, पहिल्या शोसाठी तिकीट बुक करत आहेत.
या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बूशिवाय अमला पॉल, संजय मिश्रा, दीपक डोबरियाल, गजराज राव, विनीत कुमार, मकरंद देशपांडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय, रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात अभिषेक बच्चन देखील दिसणार आहे.
अजय देवगणच्या 'भोला' चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत त्याच्याच चित्रपट 'दृश्यम' 2 चा विक्रम मोडला आहे. सस्पेन्स थ्रिलर 'दृश्यम-2' ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये रिलीज होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत सुमारे 6.50 कोटींचा व्यवसाय केला होता.