Mumtaz: मुमताजपेक्षाही दिसायला देखणी आहे नताशा, या अभिनेत्यासोबत जगत आहे आनंदी आयुष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumtaz

Mumtaz: मुमताजपेक्षाही दिसायला देखणी आहे नताशा, या अभिनेत्यासोबत जगत आहे आनंदी आयुष्य

मुमताज या त्यांच्या काळातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. अभिनयासोबतच त्या त्यांच्या सौंदर्य आणि ग्लॅमरसाठीही ओळखल्या जात होत्या. 70 आणि 80 च्या दशकात त्या खूप प्रसिद्ध होत्या. त्या काळातील जवळपास सर्वच मोठ्या स्टार्ससोबत त्यांनी काम केले. आजही त्यांच्या सौंदर्याच्या चर्चा आहेत.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, मुमताज यांनी 1974 मध्ये मयूर माधवानीसोबत लग्न केले. मयूर आणि मुमताज यांना नताशा आणि तान्या या दोन मुली आहेत. लूकच्या बाबतीत नताशा तिच्या आईपेक्षा चार पावले पुढे आहे.

नताशा माधवानीचे बॉलिवूडशी खास कनेक्शन आहे. नताशाचे लग्न बॉलिवूड अभिनेता फरदीन खानसोबत झाले आहे. नताशा सौंदर्याच्या बाबतीत तिची आई मुमताजपेक्षा कमी नाही.

सोशल मीडियावर नताशाच्या फोटोंचा बोलबाला असतो. आजकाल तिचा एक फोटो खूप चर्चेत आहे, ज्यामध्ये ती तिचा पती फरदीनसोबत सिल्व्हर आणि ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

नताशा आणि फरदीन खान 2005 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. या जोडप्याला दोन मुले आहेत - एक मुलगा आणि एक मुलगी. विशेष म्हणजे फरदीन खान दिवंगत अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा आहे. संजय खान हे फरदीनचे काका आहेत, तर हृतिक रोशनची एक्स वाइफ सुझैन खान आणि अभिनेता झायेद खान हे त्याचे चुलत भाऊ आहेत.

Fardeen Khan

Fardeen Khan

फरदीन खानबद्दल बोलायचे झाले तर तो पूर्वी त्याच्या फिटनेसबद्दल खूप चर्चेत होता. हा अभिनेता बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. दरम्यान, त्याचं वजनही खूप वाढलं. आता मात्र अभिनेता पुन्हा एकदा फिट झाला आहे. पूर्वी जेव्हा फरदीनचे फोटो व्हायरल झाले होते तेव्हा तो पूर्वीसारखाच हँडसम दिसत होता.