Bholaa Movie : अजयचा 'भोला' कैथीपेक्षा वेगळा की 'कॉपी पेस्ट?' टॉलीवूडचे रिमेक किती दिवस!

बॉलीवूडचा सिंघम म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या अजय देवगणच्या भोलाचा ट्रेलर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी अजयला एका गोष्टीमुळे ट्रोल केले जात आहे.
Bholaa Ajay Devgn movie viral trailer compare Kaithi
Bholaa Ajay Devgn movie viral trailer compare Kaithi esakal

Bholaa Ajay Devgn movie viral trailer : बॉलीवूडचा सिंघम म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या अजय देवगणच्या भोलाचा ट्रेलर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी अजयला एका गोष्टीमुळे ट्रोल केले जात आहे. त्याचे कारण म्हणजे अजयचा भोला हा टॉलीवूडच्या कैथीचा रिमेक आहे अशी टीका होताना दिसते आहे.

गेल्या काही वर्षांपासून अजयला हिट चित्रपटांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. त्याच्या दृष्यम नावाच्या चित्रपटाचा अपवाद वगळता बाकीच्या चित्रपटांना जेमतेम यश मिळाले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात प्रभावी कामगिरी करण्यासाठी अजयला धडपडावे लागणार आहे. आता तर त्याच्या नव्या भोला चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळया प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

भोलाची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अजयनं त्याच्या चित्रपटाचा टीझर व्हायरल केला होता. आता त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मात्र त्यावर बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड अशा वादाचा शिक्का मारला जातो आहे. नेटकऱ्यांनी अजयनं पुन्हा एकदा टॉलीवूडची कॉपी केल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे येत्या काळात अजयला मोठ्या वादाचा सामना करावा लागणार आहे.

Bholaa Ajay Devgn movie viral trailer compare Kaithi
Ajay Devgn: 'ती खोटारडी आहे,' असं म्हणत सर्वांसमोर अजय देवगणनं रवीना टंडनचा केला होता अपमान

भोलाच्या ट्रेलरवरुन हा चित्रपट पूर्णपणे एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असल्याचे दिसून येत आहे. तो चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करेल अशी अजय देवगणला आशा आहे. भलेही काही चाहत्यांना हा चित्रपट कैथीची कॉपी वाटू शकेल, मात्र अजयनं आपला चित्रपट पूर्णपणे वेगळा असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी अजयच्या दृष्यम २ या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

Bholaa Ajay Devgn movie viral trailer compare Kaithi
नारळाच्या झाडावर वीज कोसळून शेंड्याला लागली आग; घटना कॅमेऱ्यात कैद | Viral Video

अजय देवगणच्या भोलाचा ट्रेलर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. उत्तर भारतातील प्रेक्षकांनी अजयच्या भोलाबाबत वेगळाच प्रचार आणि प्रसार सुरु केला आहे. हा चित्रपट टॉलीवूडच्या कैथीचा रिमेक आहे. असे म्हटले जात आहे. अजय देवगणचे कॅरेक्टर बनारसमधून येते. आता येत्या काळामध्ये या चित्रपटाला भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com