अमलासोबत अजयचा रोमान्स, कुणाची 'नजर न लागो!' भोलाचं पहिलं गाणं, चाहते दंग| Bholaa Song Out | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bholaa Movie song Viral

Bholaa Song Out : अमलासोबत अजयचा रोमान्स, कुणाची 'नजर न लागो!' भोलाचं पहिलं गाणं, चाहते दंग

Bholaa Song Nazar Lag Jayegi Out Now : बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. त्याचा भोला नावाचा चित्रपट चाहत्यांच्या कुतूहलतेचा विषय आहे. त्याचे पहिले गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

बऱ्याच दिवसांपासून अजयचा भोला हा चित्रपट नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. अजयला गेल्या वर्षी नशीबानं म्हणावी अशी साथ दिलेली नाही. त्याचा दृष्यम सोडल्यास बाकीच्या चित्रपटांनी निराशा केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रवाहात येण्यासाठी त्यानं भोलाच्या माध्यमातून दमदार पुनरागमन करण्याचे ठरवले आहे. भोलामधील पहिले गाणे आणि त्यातील अजयचा लूक नेटकऱ्यांना आवडला आहे.

Also Read - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

भोलाचे पहिले गाणे व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना त्याच्या ट्रेलरचे वेध लागले आहे. नजर लग जायेगी असे त्या गाण्याचे नाव असून चाहत्यांनी त्या गाण्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. भोलामध्ये अजयनं अभिनेत्री अमाला पॉलसोबत जो रोमान्स केला आहे तो नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे. बऱ्याच दिवसांनी अजय रोमँटिक भूमिका साकारली आहे. अमलानं पहिल्यादांच भोलाच्या माध्यमातून तिचा लूक रिव्हिल केला आहे. नजर लग जायेगी ही एक कव्वाली असून त्याचे संगीत चाहत्यांना आवडले आहे.

अजयच्या भोला या चित्रपटामध्ये दमदार स्टारकास्ट दिसून येणार आहे. त्यात तब्बू, दीपक डोबरियाल, शरद केळकर, या कलाकारांचा समावेश आहे. भोलामध्ये तब्बू ही एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून दीपक डोबरियाल हा निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. भोलाच्या स्टोरीविषयी सांगायचे झाल्यास, अंमली पदार्थाचा वापर, ड्रग माफिया यांच्याशी संबंधित ही गोष्ट असून त्यामध्ये बाप लेकीचं भावनिक नातंही दिसून येणार आहे. हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.