Bhool Bhulaiyaa 2 : RRR चे रेकॉर्ड ब्रेक? पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई|Bhool Bhulaiyaa 2 Box office KRK Tweet | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhool Bhulaiyaa 2 Box office KRK

Bhool Bhulaiyaa 2 : RRR चे रेकॉर्ड ब्रेक? पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई, KRK Tweet

Bhool Bhulaiyaa 2: बॉलीवूडच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे कार्तिक आर्यनची मुख्य अभिनय असलेला भुलभुलैय्याला बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा सामना रंगला होता. त्यामध्ये टॉलीवूडच्या (Tollywood Vs Bollywood) चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बॉलीवूडला टक्कर दिली होती. आज पहिल्याच दिवशी भुलभुलैय्याला बॉक्स ऑफिसवर चांगल ओपनिंग मिळाल्याचे दिसुन आले आहे. त्यानं आरआरआरचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. अभिनेता आणि समीक्षक केआरकेनं भुलभलैय्याविषयी एक विशेष ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यानं अभिनेता कार्तिक आर्यनंच कौतुक केलं आहे. तुम्ही तर मोठं यश मिळवल्याचे केआरकेनं म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भुलभुलैय्याची चर्चा रंगली होती. त्याच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. Bhool Bhulaiyaa 2 Opening Day Box office Prediction

गेल्या काही महिन्यात टॉलीवूडपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. यासगळ्यात बॉलीवूडच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारणं आणि टॉलीवूडच्या चित्रपटांना प्रतिसाद देणं हे आश्चर्यकारक बाब मानली गेली. त्यात टॉलीवूडच्या आरआरआर, केजीएफ, बिस्ट, पुष्पा यासारख्या चित्रपटांनी मोठ्या प्रमाणावर कमाई केली आहे. पुष्पा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं तर बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. भुलभुलैय्याच्या बाबत सांगायचे झाल्यास, तो पहिल्या भागाहून थोडासा वेगळा आहे. यावेळी त्यात अक्षय कुमारची जागा कार्तिक आर्यननं घेतली आहे. त्याच्यासोबत कियारा अडवाणी देखील आहे. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंत केलं आहे.

आतापर्यत भुलभुलैय्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. समीक्षकांकडून त्याचं कौतुक होत आहे. सोशल मीडियावर त्याचे प्रमोशन प्रभावी झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कार्तिक आर्यनच्या या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत होते. अखेर त्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. केआरकेनं आता जे ट्विट केलं त्यामध्ये त्यानं लिहिलं आहे की, पहिल्याच दिवशी भुलभुलैय्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. असाच प्रतिसाद राहिला तर हा चित्रपट आरआरआरचे रेकॉर्ड़ ब्रेक करेल. केआरकेनं असा विश्वास आपल्या व्टिटमधून व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Panchayat 2 Review: लांबलेला पण खिळवून ठेवणारा प्रवास

कोविड नंतर मनोरंजन विश्वानं आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षापासून प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. अशा काही चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास, डॉक्टर स्ट्रेंज 2 (इंग्लिश): 28.35 कोटी रुपये, केजीएफ 2 (हिंदी): 53.95 कोटी, आरआरआर (हिंदी): 20.07 कोटी, बच्चन पांडे: 13.25 कोटी, गंगूबाई काठियावाड़ी: 10.25 कोटी, आता भुलभुलैय्याला कंगनाच्या धाकडची जोरदार टक्कर असणार आहे. त्यामध्ये कंगनासोबतच अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा: Video : धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाचा Review

Web Title: Bhool Bhulaiyaa 2 Box Office Krk Tweet Viral On Social Media Record Break

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top