'निष्काळजीपणा करू नका'; भूमी पेडणेकर, विकी कौशल कोरोना पॉझिटिव्ह

bhumi pednekar and vicky kaushal
bhumi pednekar and vicky kaushal
Updated on

अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अभिनेता विकी कौशल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून दोघंही घरीच क्वारंटाइनमध्ये राहत आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित दोघांनीही याबद्दलची माहिती दिली. त्याचप्रमाणे सध्याच्या परिस्थितीत निष्काळजीपणा करू नका, असं आवाहनदेखील त्यांनी चाहत्यांना केलं आहे. 'सर्व नियमांचं पालन करूनसुद्धा, सर्व प्रकारची काळजी घेऊनसुद्धा माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी घरीच क्वारंटाइनमध्ये राहत असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व नियम पाळतोय. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी', अशी पोस्ट विकीने लिहिली. 

भूमी पेडणेकरनेही चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. 'मला कोरोनाची सौम्य लक्षणं असून मी बरी आहे. मी घरातच विलगीकरणात राहत आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचं मी पालन करतेय. माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्या. पाण्याची वाफ, व्हिटामीन सीच्या गोळ्या, योग्य खाद्यपदार्थ मी नियमित घेत आहे. सध्याच्या परिस्थितीत निष्काळजीपणा करू नका. सर्व प्रकारची काळजी घेऊनसुद्धा मला कोरोना झाला. मास्क परिधान करा, हात धुवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा', असा सल्ला तिने दिला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhumi (@bhumipednekar)

मनोरंजनविश्वाला कोरोनाचा विळखा
चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमार, गोविंद, एजाज खान, रोहित सराफ, विक्रांत मेस्सी, आदित्य नारायण आणि त्याची पत्नी यांना कोरोनाची लागण झाली. तर काही दिवसांपूर्वी आमिर खान, आर. माधवन, सतीश कौशिक हेसुद्धा कोरोनाबाधित झाले होते. 

राज्या ५७ हजार नवे रुग्ण
राज्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णवाढीने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत ५७,०७४ नवे रुग्ण आढळले. उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख ३० हजार झाली. तर मुंबईत ११ हजारहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात कोरोनामुळे राज्यात २२२ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची आतापर्यंतची संख्या ३० लाखांवर गेली आहे.

राज्यात अंशत: लॉकडाउन
जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, उपहारगृहे, खासगी कार्यालये, मॉल्स ३० एप्रिलपर्यंत पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने रविवारी घेतला. शनिवार आणि रविवारी संचारबंदी, रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी, दिवसा जमावबंदी, असे विविध निर्बंध लागू करत राज्य सरकारने अंशत: लॉकडाउनच लागू केला. मात्र रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नसून, वृत्तपत्र वितरणासही मुभा देण्यात आली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com