प्रियदर्शन जाधवला कोरोना; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

priyadarshan jadhav
priyadarshan jadhav
Updated on

मराठी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवला कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित प्रियदर्शनने याबद्दलची माहिती दिली. 'आज सकाळी माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करत मी स्वत:ला ताबडतोब आयसोलेट केलं. मी रुग्णालयात दाखल झालो असून वैद्यकीय उपचार घेत आहे', अशी माहिती त्याने या पोस्टद्वारे दिली. त्याचसोबत गेल्या काही दिवसांत त्याच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असंही त्याने लिहिलं. 

प्रियदर्शनने काही दिवसांपूर्वीच त्याच्या आगामी 'लव सुलभ' या चित्रपटाची घोषणा केली होती. ठाण्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. या चित्रपटात प्रियदर्शनसह प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. मात्र आता प्रियदर्शनला कोरोना झाल्यामुळे चित्रपटाची शूटिंग थांबवण्यात आली आहे. 

मनोरंजनविश्वाला कोरोनाचा विळखा
चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमार, गोविंद, एजाज खान, रोहित सराफ, विक्रांत मेस्सी, आदित्य नारायण आणि त्याची पत्नी यांना कोरोनाची लागण झाली. तर काही दिवसांपूर्वी आमिर खान, आर. माधवन, सतीश कौशिक हेसुद्धा कोरोनाबाधित झाले होते. 

राज्या ५७ हजार नवे रुग्ण
राज्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णवाढीने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत ५७,०७४ नवे रुग्ण आढळले. उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख ३० हजार झाली. तर मुंबईत ११ हजारहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात कोरोनामुळे राज्यात २२२ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची आतापर्यंतची संख्या ३० लाखांवर गेली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com