
Bhumi Pednekar : 'भूमी एकदा आरशात तरी पाहायचं', त्या अवतारानं नेटकऱ्यांची सटकली!
Bhumi Pednekar bollywood actress Kriti : बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाबरोबरच बोल्डनेसनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणून भूमीचं नाव घ्यावं लागेल. सध्या भूमी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिची साडी. यामुळे भूमीला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. तिच्या त्या व्हिडिओवरून कमेंट केल्या आहेत त्यावरुन नेटकऱ्यांचा राग दिसून येईल.
एका पार्टीमध्ये भूमी पेडणेकर आणि क्रिती सेन सहभागी झाल्या होत्या. यामध्ये दोन्ही अभिनेत्रींनी साडी परिधान केली होती. मात्र त्यांचा मेक अप हा चाहत्यांना काही आवडली नाही. त्यामुळे त्या दोघींना देखील ट्रोल केले आहे. एकानं तर भूमी तुला काही कळतं की नाही, तू आऱशात एकदा पाहायला हवे होते. क्रितीला देखील नेटकऱ्यांनी चांगलेच झाडले आहे. आपण सुंदर आहोत हे जरी खरं असलं तरी बऱ्याचदा मेकअपनं चेहरा बिघडतो. याची काळजी घ्यावी लागेल.
Also Read - डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही
त्या रात्री भूमी आणि क्रितीनं एका अॅवॉर्ड शो ला हजेरी लावली होती. त्यांनी आयव्होरी रंगाची साडी परिधान केली होती. त्यांच्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळाल्याचे दिसून आले. यापूर्वी देखील भूमीला तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे ट्रोल व्हावे लागले होते. तिची फॅशन,बोल्डनेस हा वादाचा विषय झाला होता. गेल्या काही दिवसांपासून भूमी चर्चेत आली आहे.
रेड कार्पेटवर भूमी आणि क्रितीचा लूक नेटकऱ्यांच्या वादाचा विषय होताना दिसतो आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी त्या दोन्ही अभिनेत्रींना दिलेल्या प्रतिक्रिया खास चर्चेचा विषय होताना दिसतो आहे.एकानं तर मेक अप करताना मेक अप मॅनला सांगा किंवा विचारा आपण कसे दिसतो आहोत, आऱशात पाहा अशा आशयाच्या प्रतिक्रिया त्यांना मिळाल्या आहेत.