
भूमी पेडणेकर(Bhumi Pednekar) सध्या तिच्या आगामी 'बधाई दो'(Badhai Do) सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशनच्या निमित्तानं नुकतीच तिनं एक खास साडी फॅशन डिझायनर संदिप खोसलाकडून डिझाईन करून घेतली आहे. त्या साडीवर चक्क 'प्रेम' हे दोन शब्द वेगवेगळ्या भाषेत तिनं लिहून घेतले आहेत. सध्या तिच्या या हटके साडीची जोरदार चर्चा सुरू आहे. तिच्या या साडीवर सिनेमातील तिचा सहकलाकार राजकुमार राव याची बायको पत्रलेखा मात्र भलतीच खूश आहे. सोशल मीडियावर भूमीने साडीतले काही फोटो शेअर केले आहेत. ज्या फोटोवर कमेंटबॉक्स मध्ये पत्रलेखाने भूमीसाठी खूपसारे हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. पांढऱ्या रंगाच्या जाळीदार साडीवर छोटे छोटे डायमंड्स आहेत तर संपूर्ण साडीवर लाल रंगात प्रेम या दोन शब्दांना वेगेवेगळ्या भाषेत लिहिले गेले आहे. भूमीनं साडीवर स्लिव्हलेस ब्लाऊज घालणं पसंत केलं आहे.
भूमी आता ही हटके साडी नेसून कपिल शर्माच्या शो मध्ये गेली तर काय होईल याची कल्पना नक्कीच आतापर्यंत आली असेल आपल्याला. ती आणि राजकुमार राव त्यांच्या 'बधाई दो' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं नुकतेच कपिल शर्माच्या शो(Kapil Sharma Show) मध्ये गेले होते. त्या कार्यक्रमाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात कपिलनं भूमीची घेतलेली फिरकी पाहून आपली मात्र हसून हसून पुरती वाट होतेय. सुरुवातीला तर त्या प्रोमोत दिसत आहे की कपिलनं,' साडीमध्ये भूमी खूप छान दिसते आहेस' असं म्हटलं. तर भूमीही म्हणाली,''मी मुद्दामहून साडी नेसून आले. कारण कपिलच्या शो मध्ये मी जेव्हा जेव्हा साडी नेसून आले आहे तेव्हा तेव्हा माझा सिनेमा हीट झाला आहे''. तेव्हा राजकुमार रावही तिला म्हणतो,''अगं मला आधी सांगितलं असतेस तर मी सुद्धा नेसून आलो असतो''.
या शो मध्ये राजकुमार रावने कपिलची मात्र चांगलीच मस्करी केली आहे. दीड वर्षात दोन मुलं करण्याची कामगिरी कपिल तुझ्या नावावर आहे असं राजकुमारनं म्हणाताच उपस्थितांनी टाळ्यांचा नुसता गडगडाट केलेला दिसत आहे. असो तर हा धम्माल एपिसोड लवकरच आपण पाहणार आहोत. शो चा प्रोमो इथे जोडत आहोत. त्यात आणखी धम्माल विनोद आपण पाहू शकाल. 'बधाई दो' हा सिनेमा आयुषमान खुराना,नीना गुप्ता,गजेंद्र राव यांच्या २०१८ मधील सुपरहीट 'बधाई हो' सिनेमाचा सिक्वेल आहे. 'बधाई दो' सिनेमात भूमी पी.टी टीचरच्या भूमिकेत तर राजकुमार पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसत आहे. सिनेमाचं कथानक भन्नाट आहे. लवकरच सिनेमा आपल्या भेटीस येत आहे तेव्हा तयार रहा हास्य मनोरंजनासाठी. बरं,भूमीच्या या डिझाइईनर साडीला व्हॅलेंटाईन सारी का म्हटलं हे आलंच असेल लक्षात आपल्या. तुम्ही देखील आपल्या व्हॅलेंटाईनसाठी असं हटके गिफ्ट प्लॅन करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.