नुसरतनं मेडिकल स्टोअरवर जे विकलं त्याची झाली चर्चा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Nusrata bharucha

नुसरतनं मेडिकल स्टोअरवर जे विकलं त्याची झाली चर्चा...

मुंबई - अभिनेत्री नुसरत भरुचा (nushrratt bharucha ) तिच्या हटके अभिनयासाठी प्रसिध्द आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी नुसरत सतत चर्चेत असते. ते तिच्या हटकेपणाबद्दल. ती स्वभावानं बोल्ड आहे. सध्या ती चर्चेत आली आहे याचे कारण म्हणजे तिनं शेअर केलेली एक पोस्ट. वास्तविक तिची ती पोस्ट तिच्याच एका चित्रपटाशी संबंधित आहे. त्यात तिनं एका प्रोगेसिव्ह मुलीची भूमिका केली आहे. ती नोकरीच्या शोधात आहे. त्यावेळी तिला एका काँडोम विकणा-या कंपनीत सेल्स एक्झ्युकेटिव्हची नोकरी मिळते. मात्र ती टिकवण्यासाठी तिला जे प्रयत्न करावे लागतात त्याची कथा त्या चित्रपटाच्या माध्यमातून मांड़ण्यात आली आहे. (nushrratt bharucha next film janhit mein jaari shooting will start soon)

प्यार का पंचनामा या चित्रपटाच्या माध्यमातून नुसरत लोकप्रिय झाली होती. जनहित में जारी चित्रपटाची शुटिंग लवकरच सुरु होणार आहे. त्यात नुसरनं एक वेगळ्या प्रकारची भूमिका केली आहे. आतापर्यतच्या चित्रपटामध्ये तिनं बबली टाईपच्या भूमिका केल्या आहेत. त्याला प्रतिसादही तसाच मिळाला आहे. मात्र आताचा चित्रपट सर्वाथानं वेगळा आहे. त्यामध्ये तिचा वेगळ्या प्रकारचा बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा: २४ तासांत श्रेया बुगडेच्या दोन्ही मावशींचं कोरोनाने निधन

हेही वाचा: अरिजित सिंगला मातृशोक; कोरोनामुळे निधन

बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिनं म्हटलं की, जनहित में जारी ही एक कॉमेडी फिल्म आहे. त्यात मी काँडम सेल्स (Condom sales person) एक्झुटिव्हची भूमिका पार पाडली आहे. ती एक वेगळ्या प्रकारची भूमिका आहे.ज्यात मी ती भूमिका करताना त्याचा आनंद घेतला आहे. आव्हानात्मक भूमिका होती. ती केली याचे समाधान वाटते. नुसरतच्या त्या भूमिकेविषयी सांगताना निर्माते म्हणाले की, नुसरत या चित्रपटामध्ये एका लहान मुलीच्या भूमिकेत आहे. ती एक शिक्षित आणि प्रोगेसिव्ह मुलगी आहे. तिला नोकरीची गरज आहे. त्यानंतर तिला एका काँडम बनविण्याच्या कंपनीमध्ये सेल्स पर्सनची नोकरी मिळते.

Web Title: Nushrratt Bharucha Selling Condoms In His Next Film Janhit Mein Jaari Shooting Will Start

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top