esakal | 'शुटर दादी'चे निधन, सेलिब्रेटींकडून शोक व्यक्त

बोलून बातमी शोधा

bhumi pednekar who player chadro tomar in saand ki aankh
'शुटर दादी'चे निधन, सेलिब्रेटींकडून शोक व्यक्त
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनामुळे बॉलीवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रेटींचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. अशावेळी कोरोनापासून बचाव करण्यासाठी सेलिब्रेटींनी क्वॉरंनटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. काही जण घरातच क्वॉरंनटाईन झाले आहेत. तर काही जण रुग्णालयात दाखल झाले आहे. सध्या मनोरंजन क्षेत्रातील परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण आहे. तुम्हाला 2019 मध्ये आलेला सांड की आँख नावाचा चित्रपट आला होता. त्या चित्रपटामध्ये चंद्रो तोमर नावाच्या आजी आणि प्रकाशी तोमर यांची गोष्ट साकारण्यात आली आहे. त्यापैकी चंद्रो तोमर या नेमबाज आजींचे निधन झाले आहे.

तुषार हिरानंदानी यांनी सांड की आँख या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. चंद्रो तोमर आमि प्रकाशी तोमर यांनी त्यावेळच्या सामाजिक विषमतेला तोंड देऊन नेमबाजीमध्ये नावं कमावलं होतं. एवढेच नाही तर त्यांनी जगातील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन अनेक पुरस्कारही मिळवले होते. त्यांची लोकप्रियता मोठी होती. चंद्रो तोमर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाशी लढताना त्यांचे निधन झाले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

चंद्रा तोमर यांच्या आयुष्यावर आधारित सांड की आँख चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. त्यात भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नु यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ज्यावेळी चंद्रा यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळले तेव्हा त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. अभिनेत्री भूमीनं चंद्रा आजींबरोबरच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिनं त्यांच्यासोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत. तिनं लिहिलं आहे की, चंद्रो आजी तुमच्या निधनाची बातमी ऐकली आणि मला अतिशय वाईट वाटले. तुमचं जाणं माझ्या मनाला चटका लावून गेले आहे.

तुम्ही एक भव्य आयुष्य जगला आहात. अतिशय संघर्षातून तुम्ही तुमची वाट तयार केली होती. मोठ्या कष्टानं स्वतच्या जगण्याला सार्थकी मिळवलं. यासगळ्याचा आम्हाला अभिमान आहे. मी फार नशीबवान आहे की मला तुमची भूमिका करण्याची संधी मिळाली. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. साहस, दया, विनम्रता आणि हास्य यासगळ्या गोष्टी तुमच्याकडे पाहून शिकता आल्या याचा आनंद आहे. तापसीनं लिहिलं आहे की,चंद्रो आजी तुम्ही आमच्यासाठी कायम एक प्रेरणा म्हणून राहणार आहे. ज्या मुलींना तुम्ही जगण्याची प्रेरणा दिली आहे त्यांच्यात तुम्ही नेहमी जिवंत असाल यात शंका नाही.