सुशांतच्या निधनाच्या धक्क्यातून अजुनही सावरली नाही 'ही' अभिनेत्री

टीम ई सकाळ
शनिवार, 4 जुलै 2020

सुशांतसोबत काम केलेले सहकलाकार त्याला विसरु शकत नाहीयेत.  अशी एक अभिनेत्री जिने सुशांतसोबत काम केलं होतं ती सुशांतच्या निधनाच्या २० दिवसांनंतरही त्याला विसरु शकलेली नाही.

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सगळ्यांमध्येच दुःखाचं वातावरण आहे. सुशांतच्या कुटुंबियांना तर मोठा धक्का बसलाच आहे मात्र त्याच्या चाहत्यांमध्ये आणि सहकलाकारांमध्ये देखील शोकाकुल वातावरण आहे. सुशांतसोबत काम केलेले सहकलाकार त्याला विसरु शकत नाहीयेत. त्याच्या आठवणींमध्ये अजुनही ते या धक्क्यातून स्वतःला सावरु शकत नाहीयेत. अशी एक अभिनेत्री जिने सुशांतसोबत काम केलं होतं ती सुशांतच्या निधनाच्या २० दिवसांनंतरही त्याला विसरु शकलेली नाही. सोशल मिडियावर तिने त्याच्या आठवणीत मोठी पोस्ट लिहिली आहे.

हे ही वाचा: सुशांतची एक्स मॅनेजर दिशासोबतच्या कनेक्शनवर आली सूरज पांचोलीची प्रतिक्रिया..

अभिनेत्री भूमिका चावलाने एमएस धोनी सिनेमात सुशांतच्या बहिणीची भूमिका साकारली होती. सुशांतचा एक फोटो पोस्ट करत तिने लिहिलंय, 'जवळपास २० दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले, मी सकाळी उठते आणि माझ्या डोक्यात फक्त तुझेच विचार येतात. अजुनही मला आश्चर्य वाटतं की असं काय झालं? एकाच सिनेमात मी तुझ्यासोबत स्क्रीन शेअर केली आणि तुझ्यासोबत एक नातं जाणवलं. ते नैराश्यंच होतं का? की आणखी कोणती वैयक्तिक गोष्ट होती? तेव्हा तुला बोलायला हवं होतं.'

भूमिका पुढे लिहिते की, 'जर ही प्रोफेशनलशी संबंधित गोष्ट असेल तर मला यावर आक्षेप आहे कारण तु खूप चांगले सिनेमे केले होतेस. होय हे मला माहित आहे की इथे तग धरुन राहणं सोपं नाहीये. मी इथे इनसायडर किंवा आऊटसायडर बद्दल बोलत नाहीये. ही खरी गोष्ट आहे की ५० पेक्षा जास्त सिनेमे करुन देखील मला इंडस्ट्रीमध्ये कोणासोबत नातं जोडायला कठीण वाटायचं. मात्र मी परमेश्वराचे आभार मानते की मी अजुनही काम करत आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

It’s been almost 20 days ...PRAYERS FOR YOU - wherever you are and prayers for your family

A post shared by Bhumika Chawla (@bhumika_chawla_t) on

भूमिका सांगते की, 'हे आयुष्य आहे इथे मेहनत आणि प्रयत्नांशिवाय काहीही मिळत नाही. आणि शेवटी जर कोणती दुसरी गोष्ट आहे ज्यावर तुम्ही प्रोफेशनली नाराज आहात आणि नैराश्यात जात आहात तर लक्षात ठेवा की हे शहर आपल्याला स्वप्न देतं, नाव देतं, कधीकधी अनामिक देखील करतं, लाखो लोकांमध्ये एकटं पाडतं. जर कोणती दुसरी गोष्ट असेल तर मला वाटतं की ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. सत्य समोर आलं पाहिजे. सुशांत तु जिथे कुठे आहेस देव तुझ्या आत्म्याला शांती देओ.'  

bhumika chawla remembering sushant singh rajput and write a post


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhumika chawla remembering sushant singh rajput and write a post