सुशांतची एक्स मॅनेजर दिशासोबतच्या कनेक्शनवर सूरज पांचोलीने दिली प्रतिक्रिया..

sooraj pancholi
sooraj pancholi

मुंबई- दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्युसोबत अभिनेता सूरज पांचोलीचं कनेक्शन असल्याच्या बातम्या सोशल मिडियावर जोर धरत होत्या. सूरज यासाठी ट्विटरवर टॉप ट्रेंडिंगमध्ये देखील होता. मात्र यूजर्सनी सूरजला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केल्याने अखेर यावर सूरजने प्रतिक्रिया दिली आहे. 

सूरज पांचोली शुक्रवारी ट्विटरवर टॉप ट्रेंडिंगवर होता. सूरजला यूजर्सनी सुशांतची एक्स मॅनेजर दिशाच्या मृत्युशी कनेक्शन असल्याचं सांगत ट्रोल केलं होतं. मात्र या सगळ्या प्रकरणावर सूरजने त्याची प्रतिक्रिया देऊन या बातम्यांचं खंडन केलं आहे.

एका मुलाखती दरम्यान सूरजने सांगितलंय की, 'मी दिशाला ओळखत नाही. मी माझ्या आयुष्यात तिला कधी भेटलो नाही. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर मला दिशाच्या आत्महत्येबद्दल कळालं तेही सोशल मिडियाच्या माध्यमातून. मी तिच्यासोबत कधी बोललो देखील नाही, मला हे दखील माहित नाही की ती कशी दिसत होती.'

सूरजने पुढे म्हटलंय की, 'जे लोक आता या जगात नाहीत त्यांच्याबद्दल अशा प्रकारच्या बातम्या पसरवणं चूकीचं आहे. मुलीच्या कुटुंबाबाबत, तिच्या भावा-बहिणींबाबत जरा विचार करा. हे खूपंच वेदनादायक आहे कारण की ते माझ्याबद्दल लिहित नाही आहेत पण त्या व्यक्तीबाबत लिहित आहेत जी व्यक्ती आता या जगात नाही. ज्या लोकांकडे करण्यासारखं काहीही नाही त्यांनी हे सिनेमाच्या स्क्रीप्टसारखं लिहिलं आहे.मला असं वाटतं की मी माझी प्रतिक्रिया देऊन माझा वेळ वाया घालवत आहे.'

सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियनने १० जून रोजी मालाडमधील एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. दिशा सुशांत व्यतिरिक्त वरुण शर्मा, भारती सिंह यांची देखील मॅनेजर होती. तर दुसरीकडे सूरज पांचोलीचं नाव गर्लफ्रेंड जिया खानच्या प्रकरणात समोर आलं होतं. जिया खानने मुंबईत ३ जून २०१३ला आत्महत्या केली होती.    

sooraj pancholi dismisses social media speculation about disha salian death  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com