Video Viral; बोललं की लागते लाईट, अमिताभ यांचा हायटेक मास्क

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 27 January 2021

अमिताभ सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयावर पोस्ट लिहितात. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं त्यांनी एक पोस्ट शेयर केली होती.

मुंबई -  बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सातत्यानं अॅक्टिव्ह असतात. लॉकडाऊनच्यावेळीही ते आपल्या चाहत्यांशी संवाद साधत होते. कोरोनात काय काळजी घ्यावी याविषयी माहिती देत होते. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओला गेल्या 15 तासांत 15 लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाले आहेत. अमिताभ यांच्या चाहत्यांना तो व्हिडिओ प्रचंड आवडला आहे.

अमिताभ सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयावर पोस्ट लिहितात. त्या वाचकांच्या आवडीच्या असतात. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं त्यांनी एक पोस्ट शेयर केली होती. त्यात एक व्हिडिओ होता. यात अमिताभ यांनी एक मास्क लावला आहे. तो मास्क आता चर्चेत आला आहे. तो व्हिडिओ  हिट झाला आहे. तो व्हिडिओ पाहून अमिताभ यांची नात नव्या नवेली नंदानं आनंद व्यक्त केला आहे. अमिताभ बच्चन यांनी त्या व्हिडिओमध्ये तो मास्क दर्शकांना दाखवला आहे. त्यानंतर त्यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या त्या व्टिटवर अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंही रिव्टीट केले आहे. तर नव्या नवेली नंदानं लव इट नावाची कमेंट दिली आहे.

मागील वर्षी बच्चन यांच्या परिवारात कोरोनानं शिरकाव केला होता. त्यावेळी त्यांनी सर्वांना सावधान करण्यासाठी कोरोनाविषयी एक पोस्ट लिहिली होती. तेव्हा अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  रुग्णालयात असतानाही अमिताभ सोशल मीडियाच्याव्दारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधत होते. 
  
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big b Amitabh bacchan wears hi fi mask video viral on republic day grand daughter navya naveli nanda impressed