esakal | बिग बींची खास नंबरची अलिशान कार; फोटो व्हायरल झाल्यावर ट्रोलर्सनी दिला सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

big b car

अमिताभ बच्चन यांच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयजसारख्या कारचा सामावेश आहे. आाता त्यांच्या या कार कलेक्शनमध्ये आणखी एका कारचा समावेश झाला आहे.

बिग बींची खास नंबरची अलिशान कार; फोटो व्हायरल झाल्यावर ट्रोलर्सनी दिला सल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - कोरोनावर मात करुन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी काही दिवसांपुर्वीच केबीसी 12 चं शूटिंग त्यांनी सुरू केलं होतं. जया बच्चन वगळता सर्व बच्चन कुटूबातील सर्वांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. आता अमिताभ बच्चन यांनी नवीन कार घेतली आहे.  अमिताभ  यांनी S Class मर्सिडीज खरेदी केल्याची माहिती सुत्रांनी सांगितली आहे. ही S Class मर्सिडीज कार भारतात आजच लाँच झाली आहे. याची किमंत कोटींमध्ये आहे. ऑनलाईन माहितीनुसार या कारची किंमत जवळपास 1 कोटी 38 लाख रुपये आहे. S Class या मर्सिडीज कारचं रजिस्ट्रेशन अमिताभ बच्चन यांच्या नावाने झालं आहे. याचे फोटो विरल भयानीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आले आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयजसारख्या कारचा सामावेश आहे. आाता त्यांच्या या कार कलेक्शनमध्ये आणखी एका कारचा समावेश झाला आहे. या कारचा नंबरही खास आहे. अमिताभ बच्चन नेहमी त्यांच्यासाठी 11 हा आकडा  लकी मानतात. तसेच त्यांचाी 11 ऑक्टोबर ही जन्म तारीखही आहे. अमिताभ यांच्या या नव्या कारचा नंबर MH02FJ4041 आहे. यातील आकड्यांची बेरीज केल्यास एकूण 11 होते. सध्या अमिताभ बच्चन यांच्याकडे अनेक कार आहेत. 

.

कोरोनाचा लागण झाल्यानंतरही उपचारादरम्यान अमिताभ यांनी सोशल मीडियामधून चाहत्यांचा संपर्कात होते. केबीसीचं शूटिंग सुरू झाल्यानंतर अमिताभ यांनी आपल्या सोशल मीडियावर शुटींगचे फोटोही शेअर केले होते. कोरोना प्रतिबंधक सर्व खबरदारी घेऊनच KBCचं शुटींग पार पडलं होतं.

कंगना म्हणते,'रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, विक्की कौशल ड्रग टेस्ट करा'

ट्रोलर्स म्हणाले - 'जर इतके पैसे असतील तर देणगी द्या.'
इंस्टाग्रामवर अमिताभ यांचा कारसोबतचा फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अमिताभ बच्चन मास्क परिधान करुन कारसमोर उभे असल्याचे दिसत आहे. यात त्यांना कारची चावी दिली जात आहेत. या पोस्टमुळे काही लोक अमिताभवर चांगलेच भडकलेले दिसत आहेत.  एका युजरने लिहिले, जर इतके पैसे असतील तर दान का नाही करत?  दुसर्‍या एका युजरनेकर्त्याने लिहिले - किती हा देखावा?