esakal | कंगना-जया बच्चन वादावर अमिताभ यांचं ट्विट, सोशल मिडियावर होतेय बिग बींच्या 'या' ट्विट्सची चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

amitabh jaya

सोशल मिडियावर जया बच्चन यांना मोठ्या प्रमाणावर टिकेचा सामना करावा लागत आहे. असं असताना कंगना- जया बच्चन यांच्या वादात आता बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विट्स करत अप्रत्यक्षपणे जया यांना ट्रोल करणा-यांना टोला लगावलाय.  

कंगना-जया बच्चन वादावर अमिताभ यांचं ट्विट, सोशल मिडियावर होतेय बिग बींच्या 'या' ट्विट्सची चर्चा

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी संसदेत बॉलीवूडमधील ड्रग कनेक्शनबद्दल विधान करताना रवि किशन आणि कंगना रनौतवर निशाणा साधला. आता हा वाद वाढतंच चालला आहे. बॉलीवूडमधील अनेक जण यावर प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मिडियावर जया बच्चन यांना मोठ्या प्रमाणावर टिकेचा सामना करावा लागत आहे. ट्रोलर्सच्या धमक्यांमुळे अमिताभ आणि जया यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेरील सुरक्षा देखील वाढवण्यात आसी आहे. असं असताना कंगना- जया बच्चन यांच्या वादात आता बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विट्स करत अप्रत्यक्षपणे जया यांना ट्रोल करणा-यांना टोला लगावलाय.  

हे ही वाचा: सुजैन खानने फोटो शेअर करत म्हटलं, 'जर तु सोडून गेलास..', हृतिक रोशनने केली अशी कमेंट  

अमिताभ बच्चन यांचे दोन ट्विट्स सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. पहिल्या ट्विटमध्ये बिग बींनी म्हटलंय, 'झुठे हे लोग जो सुबह को शाम, शाम को अंधेरे, कहते है, देखा है हमने चिरागों से जलने वाले चिरोगों को घेरे रहते है. ' हे ट्विट अमिताभ यांनी जया यांना ट्रोल करणा-यांना अप्रत्यक्षपणे उद्धेशून म्हटल्याचं दिसतंय. इतकंच नाही तर याआधी देखील बिग बी यांनी एक ट्विट केलं आहे जे खूप चर्चेत आहे. 

या ट्विटमध्ये बिग बींनी म्हटलंय, 'सागर को घमंड था कि मै सारी दुनिया को डुबा सकता हु. इतने मे तेल की एक बुंद आई और तेर कर निकल गई.' बिग बींच हे ट्विट जोरदार व्हायरल होतंय. असं पहिल्यांदा होत नाहीये की अमिताभ यांचे ट्विट्स व्हायरल झालेत मात्र त्यांचे हे ट्विट्स जया बच्चन यांच्या ट्रोलर्सला सणसणीत उत्तर असल्याने जास्त चर्चेत आहेत.    

big b amitabh bachchan tweet jaya bachchan rajya sabha kangana ranaut