Big Boss 13 : 'या' अभिनेत्रीने बिकिनी घालण्यास दिला नकार, जाणून घ्या कारण

Big Boss 13 : Mahira Sharma
Big Boss 13 : Mahira Sharma
Updated on

मुंबई : सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे 'बिग बॉस'. याच लोकप्रियतेमुळे शोचं सध्या तेरावं पर्व सुरु झालं आहे. एकुणच या शोचा असणारा फॉरमॅट आणि खेळाचे नियम हे प्रत्येक पर्वासह बदलतात. त्याचे टास्क आणि शोची थीम यामुळे अनेक वाद होताना दिसत आहेत. काहीवेळा घरातील सदस्य बोल्ड पद्धतीनेही प्रेक्षकांसमोर दिसतात. त्यामुळे सतत कोणत्यातरी कारणाने हा शो चर्चेत असतो. यंदाच्या पर्वामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. घरातील सर्वच मुली स्ट्रॉंग आहेत त्याचसोबत फॅशनच्या बाबतीतही अग्रेसर आहेत. शोमध्ये सहभागी झालेल्या एका अभिनेत्रीने बिकिनी घालण्याल मनाई केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Where are my followers from ?  Earring @swagsatrangi

A post shared by Mahira Sharma (mau) ماهرة (@officialmahirasharma) on

या अभिनेत्रीचं नाव माहिरा शर्मा असून तीने बिकिनीच्या संदर्भात दिलेलं विधान नुकतचं समोर आलं आहे. या शोमध्ये येण्याआधी माहिराने एका मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींवर खुलेपणाने मत व्यक्त केलं होतं. करीअर ते खाजगी जीवनापर्यंत सर्व विषयांवर ती बोलली. या मुलाखतीदरम्यान ती म्हणाली,' मी बीग बॉसच्या शोमध्ये कधीच बिकिनी घालणार नाही. मी ऑनस्क्रीन कधी बिकिनी घातली नाही त्यामुळे शोमध्ये तर मुळीच घालणार नाही. तसही माझ्या घरामध्ये या गोष्टीची परवानगी नाही आणि मी स्वत: बिकिनीमध्ये कम्फर्टेबल फिल करत नाही'. 

बॉयफ्रेंड आणि पार्टनर बनवण्याविषयी ती म्हणाली,' एंटरटेंनमेंट इन्डस्ट्रीमध्ये फ्लर्टींग वैगरे सामान्य आहे. इथे सर्वच एकमेकांशी फ्लर्ट करतात. पण मला असं वाटत नाही की बिग बॉ़सच्या घरामध्ये कोणाला प्रेम मिळतं.' पुढे ती म्हणाली,' तसही मी काश्मीरची आहे आणि तिथे अशा गोष्टींची परवानगी नाही. त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये 'नो बॉयफ्रेंड' हा माझा एकच नियम असणार आहे'.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Caught you looking back at me,so I turned away 

A post shared by Mahira Sharma (mau) ماهرة (@officialmahirasharma) on

 माहिरा पंजाबमधील लोकप्रिय मॉडेल आहे. मॉडेलिंगने तिनं करीअरला सुरुवात केली आणि त्यानंतर 'यारों का टशन' या शोपासून अभिनय सुरु केला. याशिवाय 'तारक मेहता का उल्टा चष्मा', 'पार्टनर ट्रबल हो गई डबल' आणि 'नागिन' या सुप्रसिद्ध मालिंकामधून ती झळकली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com