esakal | 'लोक किती खालच्या थराला चाललेत' सिध्दार्थ शुक्ला संतापला

बोलून बातमी शोधा

Big boss 13 fam siddharth shukla  tweet

'लोक किती खालच्या थराला चाललेत' सिध्दार्थ संतापला

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सध्या सुरु आहे. दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अनेक रूग्णालयात रूग्णांना औषधं, रेमडेसिवीर इन्जेक्शन, ऑक्सिजन बेड मिळत नाहिये. अशा वेळी काही ठिकाणी या सर्व गोष्टींचा काळा बाजार होत आहे. याचा निषेद करत बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने नुकतेच ट्विट केले आहे.

सिध्दार्थ सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो.देशात घडणाऱ्या घटनांनबद्दल तो नेहमी आपले मत सोशल मीडियावर मांडतो. ऑक्सिजन सिलेंडरमधून नफा कमावणाऱ्यांवर सिध्दार्थने ट्विटमधून टीका केली आहे. या ट्विटला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. ट्विटमध्ये सिध्दार्तने लिहीले, ‘लोक एवढे खालच्या थराला गेलेत हे पाहून दुःख होतं. ज्या गोष्टीमुळे लोकांचा जीव वाचू शकतो अशा ऑक्सिजन सिलेंडर आणि गोळ्या औषधांमधूनही नफा कमवायचा विचार करत आहेत. लोक मरत आहेत पण आज जगात सगळ्यात स्वस्त माणसाचं आयुष्य झालं आहे.’

सिध्दार्थचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,बिग बॅस सिझन 13 चा विजेता असलेल्या सिध्दार्थचा चाहता वर्ग मोठा आहे. छोटया पडद्यावरच्या या कलाकाराच्या प्रत्येक मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते.पण आता अभिनयामुळे नही तर सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टमुळे तो सध्या च्रर्चेत असतो. काही दिवसांपुर्वी सिध्दार्थने पाकिस्ताच्या पंतप्रधानांना खडे बोल सुनावले होतो. इम्रान खान यांनी, ‘बलात्कार घटनांना अश्लिलता, पाश्चिमात्य आणि भारतीय संकृती जबाबदार आहे’ असे वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देत सिध्दार्थने ट्विट केले, ’वाह रे दुनिया वालो.. मग तर अश्या प्रकरणात ज्या पुरूषांकडे संयम नाही म्हणता, त्यांना नपुंसक बनवले पाहिजे.’ या ट्विटला नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती.