Big boss 13 : असिम आणि सिध्दार्थच्या फॅनमध्ये सुरु ट्रेंडवॉर

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

Big boss 13 : सिध्दार्थ आणि आसिममधील भांडण आता त्यांच्यापुरते मर्यादित राहिले नसून त्या दोघांच्या फॅनमध्ये सुरु झाले आहे. दोघांचेही फॅन सोशल मिडियावर त्यांना सपोर्ट आणि ट्रोल करत आहेत. 

मुंबई : बिगबॉस हा कॉन्ट्रवर्शिअल रिअॅटीलिटी शो सध्या चर्चेत आला आहे. बिगबॉस 13 मधील सदस्य सिध्दार्थ शुक्ला आणि आसिम रियाज या दोघांमधील भांडणामुळे सध्या चर्चेत आहे. बिगबॉस 13 मध्ये पहिले काही आठवडे सिध्दार्थ आणि आसिम खुप चांगले मित्र होते. दरम्यान, त्यांच्यामध्ये गैरसमजांमुळे भांडण झाली. सिध्दार्थ आणि आसिम दोघेही तापट स्वभावाचे आहे. त्यामुळे प्रत्येक भांडणात ते व्हॉयलेंट होताना दिसतात. सिध्दार्थ आणि आसिममधील हे भांडण त्यांच्यापुरते मर्यादित राहिले नसून त्या दोघांच्या फॅनमध्ये सुरु झाले आहे. दोघांचेही फॅन सोशल मिडियावर त्यांना सपोर्ट आणि ट्रोल करत आहेत. 

सिध्दार्थ आणि आसिममध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये खुप वादावादी झाली. जवळपास तीन ते चार दिवस त्यांची ही वादावादी सुरुच होती. त्यांच्या या भांडणांमुळे बिगबॉस 13 चा होस्ट सलमान खान देखील नाराज होता. दोघांनी या भांडणामध्ये धक्काबुक्की केली होती. सलमानने त्यांच्या या वागणूकीसाठी दोघांना खुप सुनावले पण, त्यांना घरातून बाहेर काढले नाही. बिगबॉसच्या आधीच्या एका सिझनमध्ये धक्का मारल्यामुळे प्रियांक शर्माला बाहेर काढले होते. त्यामुळे, यावेळी देखील असेच होईल असे प्रेक्षकांना वाटत होते. 

काल बिगबॉस13 च्या कॅपटन्सी टास्कमध्ये सिध्दार्थ आणि आसिम यांच्यात पुन्हा वादावादी आणि धक्काबुक्की झाली. त्यामुळे सिध्दार्थ शुक्लाच्या नाराज फॅनने #EvictHatemongerAsim,  #KeepGoingSidharthShukla असा ट्रेंड सुरु केला आहे तर, आसिमच्या चाहत्यांनी  #WestandWithAsim असा ट्रेंड सुरु केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big boss 13 Trendwar on the internet between Aasim and siddharth fans