
एजाज आणि पवित्राच्या प्रेमाची गोष्ट सर्वांचे लक्ष वेधून घेणारी होती. त्यानं अनेकदा तिला प्रपोझ केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.
मुंबई - बिग बॉसच्या घरातून एजाज खान त्य़ाच्या वैयक्तिक कारणास्तव बाहेर पडला. त्यानंतर बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांनी खंत व्यक्त केली. काहींनी आनंद व्यक्त केला मात्र तो न दाखवता. रागीट स्वभावाच्या एजाजनं अनेकांशी पंगा घेतल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्याला दोन तीन सहकारी वगळता इतर कुणी सहकार्य करत नव्हते. एजाजच्या आणि पवित्राच्या प्रेमाची गोष्ट कुणापासून लपवून राहिलेली नाही. त्य़ांनी सोशल मीडियावर आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
एजाज आणि पवित्राच्या प्रेमाची गोष्ट सर्वांचे लक्ष वेधून घेणारी होती. त्यानं अनेकदा तिला प्रपोझ केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. मात्र आपण काही केल्या पवित्राची साथ सोडणार नाही असे म्हणत त्यानं तिला प्रपोझ केलं होतं. आता एजाजला ही गोष्ट पुढे न्यायची आहे. त्यासाठी त्यानं पवित्राला थेट लग्नासाठी विचारणा केली आहे. एजाजनं यापूर्वी आपल्याला स्वप्नातली राजकुमारी भेटली आहे असे सांगितले होते. अनेकांनी त्यांच्यावर अशी टीका केली होती की केवळ या शो मध्ये टिकून राहायचे म्हणून त्यांनी प्रेमाचे नाटक केले आहे. यावर एजाजनं टीका करणा-यांना फटकारले होते. तो म्हणाला, लोकं काय म्हणतात याचे मला काहीही घेणे नाही. आपल्याला जे आवडते ते इतरांना आवडायला हवे असा काही अट्टाहास नाही. त्यामुळे आपण काहीही केलं तरी प्रत्येकवेळी लोकांच्या नजरेत चांगले राहू हे सांगता येणार नाही.
आता एजाज बिग बॉसच्या घराबाहेर गेला आहे. मात्र त्यानं पवित्राला मागणी घालण्याचा निर्धार केला असल्यानं तो तिच्या घरी गेला. यावरुन त्या नात्यावरुन किती गंभीरपणे विचार करतो आहे याची कल्पना येईल. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखती दरम्यान एजाजने सांगितले की, मला पुनिया फार आवडते. आम्हाला एकमेकांबद्दल आदर आहे. आणि मला तिच्या सोबत लग्न करायचे आहे. बराच काळ आम्ही एकमेकांसोबत घालवला आहे. आमच्या दोन्ही परिवारांना आम्ही समजावले आहे. त्यासाठी थोडा विरोध झाला.
एजाजनं सांगितले की, आम्हाला कुठलीही घाई नाही. मी बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर तिच्या घरच्यांना भेटायला गेलो. त्यावेळी तिच्या भावाला भेटलो. मी त्याला सांगितले की, मी एक चांगला माणूस आहे. माझा दुसरा कुठलाही हेतू नाही. मला तुम्हा सगळ्यांना भेटायचे आहे. कारण आपल्या दोन्ही परिवारांध्ये काही गैरसमज आहेत. मी आता सगळ्यांना सांगितले आहे की पवित्रावर माझे खूप प्रेम आहे. आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही परिवाराची भेट घेतल्य़ानंतर मी अर्धी लढाई जिंकली आहे. याशिवाय आणखी मला काही करायचे नाही.