esakal | 'कोरोना झालायं याचा तिला आनंद झालायं'...

बोलून बातमी शोधा

 big boss 14 fame actress rubina dilaik

'कोरोना झालायं याचा आनंद, काय म्हणावं?'

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

मुंबई - देशात कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आशा वेळी कोरोना टेस्टचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर त्या रूग्णांमध्ये मनामध्ये अनेकवेळा नैराश्य आणि भिती निर्माण होते. पण अभिनेत्री रूबिना दिलैकला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला पाहून आनंद झाला आहे. रूबिनाने सोशल मीडियावरून तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये रूबिनाने लिहीले, ‘मी नेहमी प्रत्येक गोष्टीची सकारात्मक बाजू पाहते, यामध्ये सुद्धा तसचं आहे. मी हा विचार करत आहे, आता एका महिन्यानंतर मीसुद्धा प्लाज्मा डोनेट करण्यास पात्र ठरेन. माझा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे येत्या 17 दिवस मी होम क्वारंटाईन असणार आहे. तसेच या 5 ते 6 दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कृपया आपली चाचणी करून घ्यावी.’ रूबिनाच्या या पोस्टचे सोशल मीडियवर कौतुक होत आहे. तिचा सकारत्मक दृष्टीकोण नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. रूबिनाच्या चाहत्यांनी या पोस्टला कमेंट करून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. बिग बॉसमधील अली गोनी आणि निक्की तांबोळीने या पोस्टला कमेंट करून चिंता व्यक्त केली आहे.

बिग बॉस विजेती रूबिना दिलैकचा चाहता वर्ग मोठा आहे. बिग बॉसची शो जिंकल्या नंतर तिला विशेष लोकप्रियता मिळाली. रूबिना सध्या एका म्युझिक व्हिडीओच्या शूटिंगमध्ये व्यस्थ होती. नुकतेच रूबिनाचे बिग बॉसमधील स्पर्धक पारस छाब्रासोबतचे ‘गलत’ हे गाण प्रदर्शित झाले. रूबिनाचे पती अभिनेता अभिनव शुक्लासोबतच्या ‘मरजानिया’ या रूबिनाच्या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.