बिग बॉस च्या घराला कुलूप?सलमाननेच दिली माहिती.. Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan at Big Boss 15 house

बिग बॉस च्या घराला कुलूप?सलमाननेच दिली माहिती..

कलर्स वाहिनीवरील 'बिग बॉस' (Big boss) सिझन १५ चा आता त्याच्या अंतिम टप्प्याकडे प्रवास सुरू आहे. फिनालेमध्ये जाण्यास दावेदार होण्यासाठी स्पर्धकांमध्ये टास्कच्या माध्यमातून रंगलेला जंगी सामना पाहायाला मिळत होता. तसा सुरुवाीपासूनच हा शो म्हणावा तसा जम बसवू शकला नाही. वाहिनीने काही भांडखोर स्पर्धक शो मध्ये आणून एक असफल प्रयत्न केला खरा,पण राखी सावंत,अभिजित बिचुकले,देबोलिना हे स्पर्धक वाईल्ड कार्ड एन्ट्रीने येऊनही त्यांच्या येण्याने शो चा टीआरपी वाढण्याऐवजी तो वादातच अधिक अडकला गेला. त्यात आता उमर रियाझला शो मधूुन बाहेरचा रस्ता दाखवल्यानं शो विरोधात प्रेक्षकांमध्ये आणखी नाराजगी पसरली आहे. असा शो चा टीआरपी घसरत असतानाही का बरं दोन आठवड्यांसाठी शो पुढे ढकलला जातोय अशा चर्चांना वेग आलाय.

नुकताच बिग बॉस शो चा एक प्रोमो व्हायरल झालाय. ज्यात स्पर्धकांना सलमान खान शो चा कालावधी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे सांगताना दिसतोय. राखी सावंत सोडून मात्र कोणच या बातमीनं खुश झाल्याचं दिसत नाही. आता मुळ कारण काय आहे यामागचं ते थोडं स्पष्ट करतो. तर त्याचं झालं असं की दोन दिवसांपूर्वीच बिग बॉसचा आवाज असलेले अतुल कपूर कोरोना पॉझिटिव्ह आले अनं लगोलग शो च्या सेटवर त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या देखील कोरोना चाचण्या करण्यात आल्या. जर बहुतांशी स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आला तर शुटिंग थांबवण्यात येणार असल्याचं बोललं गेलं होतं. तेव्हा आता कदाचित तसंच झालं असेल अनं त्यामुळे वाहिनीला शो चा कालावधी वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला असावा बहुधा. घरातील सदस्यांसाठी कदाचित ही ब्रेकिंग न्यूज होती म्हणूनच प्रोमोमध्ये कुणी फारसं हॅप्पी दिसत नाही आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top