Sajid Khan Viral Video: 'मेरा कॅरेक्टर ढिला था..', अफेअर्स विषयी साजिदचे अनेक दावे अन् खुलासे... Big Boss 16 Contestant | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big Boss 16 Contestant Sajid Khan talks about his linkups and split with gauhar khan

Sajid Khan Viral Video: 'मेरा कॅरेक्टर ढिला था..', अफेअर्स विषयी साजिदचे अनेक दावे अन् खुलासे...

Sajid Khan Viral Video: बिग बॉस १६ मध्ये साजिद खानची एन्ट्री झाल्यानंतर त्याच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. सोशल मीडियावर त्याला शोमधून बाहेर काढण्याची मागणी जोर धरून आहे. त्याच्या चारित्र्यावर बोट दाखवत शोमधून बाहेर काढण्याची मागणी केली जात आहे. साजिदला MeToo प्रकरण चांगलंच अंगाशी आले आहे हे त्यावरनं स्पष्ट होतंय.

या मोहिमेअंतर्गत त्याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते, त्यानंतर त्याच्यावर काही वर्षांसाठी बंदीही घालण्यात आली होती. अनेक अभिनेत्रींनी MeToo मोहिमेअंतर्गत त्याचे 'खरे' रुप समोर आणले होते, त्या सर्वच अभिनेत्री साजिदला बिग बॉसच्या घरात पाहून संतापल्या आहेत. यादरम्यान आता त्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे,ज्यात तो स्वतःविषयीच काही खुलासे करत आहे,स्वतःच्याच बिघडलेल्या चारित्र्याविषयी कथन करताना दिसत आहे.(Big Boss 16 Contestant Sajid Khan talks about his linkups and split with gauhar khan)

हेही वाचा: Vaishali Takkar Suicide: '...नाहीतर माझ्या आत्म्यास शांती मिळणार नाही, वैशालीच्या सुसाईड नोटनं खळबळ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मुलाखतीच्या व्हिडीओत साजिद गौहर खानशी असलेल्या अफेअर संदर्भात बोलताना दिसत आहे. गौहरसोबत त्याचा साखरपुडा झाला होता,पण त्याच्या अनेक अफेअर्समुळे ते नातं तुटलं आणि गौहर सोबत त्याचं लग्न होऊ शकलं नाही असं देखील साजिद म्हणाला आहे. किरण जुनेजा यांच्या 'कोशिश से कामयाबी तक' या कार्यक्रमात साजिदला गौहर खान पासून वेगळं होण्याचं कारण विचारलं गेलं होतं,त्यावेळी त्याने स्वतःविषयी अनेक खुलासे केले आहेत. तो स्वतःच म्हणताना दिसत आहे की, 'माझं कॅरेक्टर बिघडलेलं होतं'.

मुलाखतीत साजिद म्हणताना दिसत आहे की, ''मी मुलींच्या बाबतीत फारसा एकनिष्ठ नव्हतो. मी अनेक मुलींना एकाचवेळी डेट करायचो. मी कोणासोबत चुकीचं कधीच वागलो नाही, फक्त प्रत्येकीला 'आय लव्ह यू', 'विल यू मॅरी मी?' असं म्हणायचो. आतापर्यंत तर माझी ३५० लग्न व्हायला हवी होती''.

हेही वाचा: 450 वर्ष जुन्या महालात हंसिका घेणार सात फेरे!

या व्हिडीओत साजिद खान असंही बोलताना दिसत आहे की, ''लग्न तेव्हाच यशस्वी होतं,जेव्हा दोन लोक लग्नानंतर आपल्या नात्याला मैत्रीसारखं जपतात. खऱ्या प्रेमातच खूप उतार-चढाव पहायला मिळतात. हे त्या कपलच्या व्यक्तिमत्त्वावर,त्यांच्या वागणुकीवर अवलंबून असतं. नातं टिकवण्यासाठी ते कसा विचार करतात हे खूप महत्त्वाचं असतं''.