Big boss 16: बिग बॉसच्या घरात एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसताना दिसणार सदस्य...TV Reality Show | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big Boss 16 dagger will be stabbed in each others back rift between priyanka- ankit

Big boss 16: बिग बॉसच्या घरात एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसताना दिसणार सदस्य...

Big Boss 16: सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' हिंदी सतत चर्चेत असतो. प्रत्येक एपिसोडमध्ये स्पर्धकांमध्ये प्रचंड वाद आणि अटीतटीची स्पर्धा पाहायला मिळते आहे. त्यात आता गौतम कॅप्टन झाल्यापासून सध्या घरातील वातावरण जास्तच तापले आहे. आज एलिमिनेशनसाठी एक नॉमिनेशन टास्क होणार आहे ज्यामध्ये स्पर्धक एकमेकांच्या पाठीवर खंजीर खुपसताना दिसतील . त्यामुळे सर्वांमध्ये जबरदस्त लढतही होणार आहे.(Big Boss 16 dagger will be stabbed in each others back rift between priyanka- ankit)

हेही वाचा: Big Boss Marathi 4: फक्त मारामारीच व्हायची राहिली बाकी...प्रसाद-समृद्धीत जुंपली

सर्व स्पर्धक नॉमिनेशन टास्कमध्ये सहभागी होत आहेत. सर्व स्पर्धक एकामागून एक पुढे येतात आणि पाठीवर खंजीर खुपसून का नॉमिनेट केले याचे कारण देऊन नॉमिनेट करताना दिसत आहेत. सौंदर्या शर्मा निमृतला नॉमिनेट करते आणि नंतर शालीन भानोत म्हणतो,'प्रियंका स्वतःला घराची नेता आहे असे समजते. प्रियंकाला वाटते की घरात सर्व समस्या हिलाच आहेत असा टोला लगावतो.यानंतर प्रियांका पुढे येते आणि शालीनला प्रतिउत्तर देते. यावरून प्रियांका आणि शालीनमध्ये जोरदार वादाची ठिणगी पेटते.

बिग बॉसच्या घरात कधी मैत्रीत दुरावा येईल याचा नेम नाही.

गेल्या एपिसोडबद्दल बोलायचे तर प्रियंका आणि अर्चनाच्या घट्ट मैत्रीत दुरावा निर्माण झाला . किचनच्या ड्युटीबाबत दोघींमध्ये तू-तू मैं-मैं झाली.

तर आज कोणाच्या पाठीत किती खंजीर खुपसले जाणार हे पाहायला मिळणार आणि अशा परिस्थितीत स्पर्धकांमध्ये नॉमिनेशनबाबत चढाओढ पाहायला मिळणार आहे.