Big Boss Marathi 4: फक्त मारामारीच व्हायची राहिली बाकी...प्रसाद-समृद्धीत जुंपलीSamruddhi-Prasad Argument | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big Boss Marathi 4: Samruddhi, Prasad  argument

Big Boss Marathi 4: फक्त मारामारीच व्हायची राहिली बाकी...प्रसाद-समृद्धीत जुंपली

Big Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टास्क दरम्यान टास्कवरून होणारी भांडणं, मारामारी, शाब्दिक चकमक, आरोप - प्रत्यारोप हे होताना आपण बघत आलोच आहे. येणाऱ्या भागात असंच काहीसं प्रसाद आणि समृध्दी मध्ये होणार आहे. (Big Boss Marathi 4: Samruddhi, Prasad argument)

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये प्रसाद समृध्दीमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचं दिसत आहे. समृद्धी-प्रसादला आतापर्यंतच्या एपिसोडमधून आपण पाहिलं असेल तर हे कधीतरी होणारच होतं हे आपणही बोलून जाल. प्रोमोत प्रसाद समृद्धीला सांगताना दिसत आहे,'' धीर धरना जरा सगळ्यांना येऊ देत, मग ऐकव ना ?'' त्यावर समृध्दीने त्याला ऐकवले "शपथ... हा डोक्यात जातो ...". प्रसादच तो, लागलीच म्हणाला, ''तू पण डोक्यात जातेस''.

हेही वाचा: Kantara: पाण्याच्या बॉट्ल्स विकल्या, हॉटेलमध्ये राबला... 'कांतारा'चा हिरो कसा बनला सुपरस्टार?

आता त्यावर समृद्धीनं थेट प्रसादला दम भरत म्हटलं, ''प्रसाद गप्प बस... नीट राहा प्रसाद ...'' आणि इथून त्यांच्या वादाला सुरुवात झाली. अंगावर धावून गेलेल्या समृध्दीला लांब राहा असं म्हणणाऱ्या प्रसादला - तू पण लांब राहत जा असं ठसक्यात समृद्धी म्हणाली. त्यावर प्रसादनं... येडी कुठली ...असं तिला म्हटलं. रागाच्या भरात हा वाद कुठवर गेला? पुढे काय झालं ? आज कळेलच.

हेही वाचा: Big Boss Marathi 4: 'कानामागून आली अन् तिखट झाली...', स्नेहलतावर भडकली अमृता धोंगडे

बिग बॉस मराठी मधील अशी भांडणं नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. तेव्हा पहात राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा.