Big Boss 16: 'हिला पैसे मिळाले की आली...', साजिद खानचं समर्थन कश्मिराला भोवलं, नेटकरी भडकले... Kashmera Shah | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big Boss 16- Kashmera Shah called hypocrite for supporting sajid khan

Big Boss 16: 'हिला पैसे मिळाले की आली...', साजिद खानचं समर्थन कश्मिराला भोवलं, नेटकरी भडकले...

Big Boss 16: बिग बॉस १६ दिमाखात सुरु झालंय, अन् लगोलग घरात स्पर्धकांमधील वादांना देखील सुरुवात झालीय. पहिल्याच भागात घरातल्यांमध्ये तू-तू,मै-मै ला सुरुवात झालेलं दिसून आलं. यादरम्यान ट्वीटरवर साजिद खानची देखील जोरदार चर्चा रंगलेली सगळ्यांनी पाहिली. २०१८ साली 'मी टू' मोहिमे दरम्यान साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप लावण्यात आले होते,आणि अशा स्पर्धकाला बिग बॉसमध्ये पाहताना नेटकरी मात्र खवळले आहेत.

पण मग असंही दिसून आलंय की सोशल मीडियावर साजिद खानविषयी लोकांच्या संमिश्र भूमिका आहेत. एकीकडे बिग बॉसच्या घरात त्याचं मिश्किल अंदाजात वावरणं चाहत्यांना आवडताना दिसतंय,तर दुसरीकडे त्याला ट्रोलही केलं जात आहे. प्रीमियरच्या एपिसोडमध्ये शहनाझ गिलनं व्हिडीओ मेसेजच्या माध्यमातून साजिद खानला पाठिंबा दिला होता. तेव्हा कितीतरी नेटकऱ्यांनी याला 'खोटा पाठिंबा' म्हणत हिणवलं होतं,तर आता कश्मिरा शहाला देखील ट्रोलं केलं जात आहे कारण तिनं देखील साजिद खानला पाठिंबा दर्शवला आहे.

हेही वाचा: अनारकलीत ऐश्वर्या दिसली अन् पब्लिक पागल...

कश्मिरा शहानं ट्वीटरवर एक पोस्ट केली आणि त्यात तिनं साजिद खानला पाठिंबा दिला. कश्मिरानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की,''शो मध्ये पहिल्यापासून माझे काही खास लोकं आहेत पण मला इथे सांगायला आवर्जुन आवडेल की साजिद खानचा मिश्किल स्वभाव आणि ईमानदारीनं खेळ खेळणं माझ्या मनाला भावलं आहे''. कश्मिराच्या या ट्वीटवर नेटकरी मात्र भलतेच संतापलेयत.

कश्मिरा शहाला ट्रोल करताना नेटकऱ्यांनी बिग बॉसच्या या एक्स कंटेस्टंटला तिचाच एक जुना डायलॉग 'कश्मिरा शक्ल देख अपनी' ला ट्रेंड केलं आहे. पण यात एक गोष्ट मात्र राहून राहून समोर येतेय ती म्हणजे जेव्हा शहनाझ गिलने साजिद खानला पाठिंबा दिला तेव्हा ट्वीटरवर 'प्राउड ऑफ यू शहनाझ' असा ट्रेंड सुरु झाला. पण जेव्हा कश्मिरानं साजिदला पाठिंबा दिला तेव्हा,कश्मिराला मात्र तु तर बोलूच नकोस...खोटारडी, स्वतःकडे पहा आधी..असं म्हटलं जातंय.

हेही वाचा: 'ग्लासभर दूध अन् डिंकाचा लाडू'; प्रियाचा भन्नाट किस्सा

एवढंच नाही तर नेटकरी म्हणतायेत की, 'कश्मिराला पैसे मिळाले असणार म्हणूनच ती साजिद विषयी एवढं चांगलं बोलतेय'., आता यावर कश्मिरा काय म्हणालीय ते पहा?

याच ट्रोलिंगला उत्तर देताना कश्मिरानं म्हटलं आहे,'' जे लोक मला वाईट बोलत आहेत त्यांना नक्कीच पैसे दिले गेलेत. उद्या जर मी यांना पैसे दिले तर माझ्यासाठी देखील चांगलंच बोलतील हे लोक.

हेही वाचा: Adipurush: शूटिंगच्या तिसऱ्याच दिवशी प्रभासनं भीतीनं दिग्दर्शकाला केलेला फोन, म्हणालेला...

सोशल मीडियावर अनेक नेटकरी कश्मिरा शहावर नाराज दिसत आहेत. एकानं लिहिलंय, कश्मिरा तुला नेमका प्रॉब्लेम कशाशी आहे? तुला कुणी आंटी म्हटलं याच्याशी का,तोच राग इथे काढतेयस का? तर दुसऱ्या एकानं कश्मिराचा आधीच्या काही वक्तव्यांचा इथे संबंध जोडत म्हटलं,जिला स्त्रियांशी बोलायचं कसं हे माहित नाही ती पुरुषाची बाजू मात्र किती चांगल्या पद्धतीनं मांडतेय,ज्यात खरंतर खोटचं जास्त आहे. मी माझ्या आयुष्यात जेवढी खोटी लोकं पाहिली आहेत त्यापैकी तू एक आहेस. मला तर त्या कृष्णा अभिषेकची दया वाटते.

बिग बॉस १६ आता कुठे सुरू झाला आहे. घरात साजिद खान व्यतिरिक्त सुंबुल तौकीर, श्रीजीता डे,टीना दत्ता, मान्या सिंग, शिव ठाकरे. सौंदर्या शर्मा, शालीन भनोट, गौतम सिंग विज, अर्चना गौतम,एमसी स्टेन, अंकित गुप्ता. प्रियंका चाहर चौधरी, गौरी नागोरी,अब्दू रोजिक, निमृत कौर अहलूवालिया असे इतरही स्पर्धक कैद झाले आहेत.

टॅग्स :Marathi News Bollywood