'तुझ्यावर प्रेम आहे’ सांगायला खूप वेळ गेला, माझ्याशी लग्न करशील?'

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 11 November 2020

कलर्स टीव्हीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर राहुलचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.  तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.दरवेळी वेगवेगळ्या कारणासाठी बिग बॉस शो चर्चेत येतो.

मुंबई - रियॅलिटी शो मधील ब-याचशा घटना या 'स्क्रिप्टेट' असतात अशाप्रकारची चर्चा नेहमी होते. यावर विश्वास ठेवायला प्रेक्षक सहजासहजी तयार नसतात. मात्र याप्रकारात अनेकदा रियल वाटायला लावणा-या घटना घडतात. खासकरुन एखादया रियॅलिटी शो मधून त्याला पसंती मिळते. आताही अशीच एक गोड बातमी बिग बॉस मधल्या शो मधील राहूल वैद्यने दिली आहे.

कलर्स टीव्हीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर राहुलचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.  तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.दरवेळी वेगवेगळ्या कारणासाठी बिग बॉस शो चर्चेत येतो.त्यात सहभागी झालेले कलाकार त्यांच्यातील वाद, भांडणे त्यामुळे बिग बॉसचा टीआरपी सतत वाढत असतो. शो मध्ये सहभागी होणारे स्पर्धक, त्यांच्यातील वाद यामुळे या शो ला प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे.

शो च्या दरम्यान अनेकजण प्रेमात पडल्याचेही उदाहरणे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.  बिग बॉसच्या या सीझनमध्येही अशीच एक खास गोष्ट घडली आहे. यंदा बिग बॉसच्या घरात राहून एका स्पर्धकाने कार्यक्रम सुरु असतानाच त्याच्या प्रेयसीला थेट लग्नासाठी विचारणा केली आहे.इंडियन आयडॉलमध्ये सर्वांच्या पसंतील उतलेला गायक राहुल वैद्य बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.

राहुलने बिग बॉसच्या घरात राहून त्याची मैत्रिण दिशा परमारला थेट लग्नाची मागणी घातली आहे, यावेळी तो म्हणाला, आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. माझ्या आयुष्यात दिशा परमार आहे. पण  ‘तुझ्यावर प्रेम आहे’, हे सांगायला मला इतका वेळ कसा काय लागला. याबद्दल मला माहित नाही, माझ्याशी लग्न करशील का?.आता मी तुझ्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहे. असं म्हणत राहुलने दिशाला प्रपोज केलं आहे.
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big boss fame Rahul Vaidya propose to Disha Parmar video viral