'माझ्यासाठी हा निर्णय धाडसी होता..', बिग बॉस फेम शिवानी सुर्वे असं का म्हणाली?Shivani Surve | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big Boss fame Shivani Surve

'माझ्यासाठी हा निर्णय धाडसी होता..', बिग बॉस फेम शिवानी सुर्वे असं का म्हणाली?

Marathi Actress Shivani Surve: दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीच्या आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफेचे तिसरे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमधून अभिनेत्री शिवानी सुर्वेचा(Shivani Surve) वेगळा डॅशिंग लूक समोर आला आहे. आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे(After Operation London Cafe) हा एक एक्शन - रोमँटिक सिनेमा आहे. यातल्या प्रत्येक कलाकाराच्या आत्तापर्यंतच्या लूकवरुन मराठी सिनेमात हा एक वेगळा प्रयोग ठरणार आहे असं म्हणता येईल. युनिफॉर्म, हातात बंदूक आणि डोळ्यात राग असा शिवानीचा लूक आत्तापर्यंत कोणी पाहिला नसेल असा आहे.(Big Boss Fame Shivani Surve speaks about his new movie look)

हेही वाचा: 'प्रिय शेजाऱ्यांनो...', टीम इंडियाकडून हरल्यावर नकुलचा पाकिस्तानला मजेशीर सल्ला

हा थक्क करणारा आहे. गोरा रंग, गोंडस चेहरा, आत्तपर्यंत शिवानीला सुंदर नायिकेच्या रुपात पाहिले आहे. आता हा तिचा ग्लॅमरस नसलेला लूक आहे, त्यामुळे तिच्या भूमिकेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. तिच्या या लूक बद्दल आणि या सिनेमातल्या भूमिकेबद्दल लवकरच उलगडा होणार आहे.

Big Boss Fame Shivani Surve speaks about his new movie look

Big Boss Fame Shivani Surve speaks about his new movie look

शिवानी तिच्या या लूकबद्दल सांगते. “आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा माझ्यासाठी खूप महत्वाचा सिनेमा आहे. आम्हाला हा लूक करताना खूप मजा आली. खरतर स्वतःला या गणवेशात पाहणं सुरुवातीला वेगळं वाटत होतं आणि याची सवय होण्यासाठी मला एक दिवस गेला . माझ्यासाठी हा निर्णय धाडसी होता. आपल्याकडे साधारणपणे नायिकेला सुंदर दाखवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण या भूमिकेची गरज अशी होती. की आम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार न करता, हा लूक ठरवावा लागला होता. एखाद्या कलाकाराला खूप वर्षे लागतात चांगली भूमिका मिळवण्यासाठी आणि मी म्हणेन की माझ्यासाठी हा बेस्टेस्ट रोल आहे. मी या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. या भूमिकेच्या मुळापाशी जाऊन मी काम केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांसमोर हा लूक घेऊन येताना खूप आनंद होतो आहे.”

हेही वाचा: ट्विंकल आता UK मध्येच राहणार असल्याचा अक्षय कुमारकडून खुलासा; म्हणाला...

आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा सिनेमा मराठी - कन्नडा भाषेत चित्रीत करण्यात आला आहे. तर हिंदी, तेलुगु, मल्याळम, तमिळ या भाषेतही सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सदागरा राघवेंद्र यांनी केले आहे. या सिनेमात मराठी - कन्नडा कलाकार आणि तंत्रज्ञ एकत्र दिसून येणार आहे. मराठी सिनेमात एक्शन - रोमँटिक सिनेमा कमी येतात, त्यात हा सिनेमा वेगळा ठरणार आहे. दीपक राणेंसोबत या सिनेमाची निर्मीती विजय कुमार शेट्टी आणि रमेश कोठारी यांनी केली आहे. हा सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Big Boss Fame Shivani Surve Speaks About His New Movie

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..