ट्विंकल आता UK मध्येच राहणार असल्याचा अक्षय कुमारकडून खुलासा; म्हणाला... Twinkle Khanna | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Twinkle Khannna Off to london...Akshay Kumar revealed the reason behind that

ट्विंकल आता UK मध्येच राहणार असल्याचा अक्षय कुमारकडून खुलासा; म्हणाला...

Akshay Kumar: ट्विंकल खन्ना लंडनला(London) निघाली आणि तिथेच ती आता राहणार अशा संदर्भात अक्षय कुमार बोलून बसला अन् नको त्या बातम्यांना ऊत आला. आता ट्विंकल लंडनमध्ये राहणार आहे,तिला सोडायला स्वतः अक्षय कुमार वेळ काढून गेलाय हे सगळं खरं आहे.पण त्यामागे एक मोठं कारण आहे. तर चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

अक्षय कुमार 9 सप्टेंबरला आपला ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. याआधीच संपूर्ण कुटुंबासोबत तो लंडनला रवाना झाला आहे. बोललं जात आहे की, अक्षय पूर्ण एक महिना लंडनमध्ये राहणार आहे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. आता त्याचे सिनेमेही बॅक टू बॅक फ्लॉप जात आहेत आणि त्यामुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. बातमी आहे की तो काही दिवस सिनेमांपासून दूर राहणार आहे. आता या सगळ्या चर्चा सुरु असताना अक्षय लंडनला जाण्याचं एक खास कारण समोर आलं आहे. यामागे कारण आहे त्याची पत्नी ट्विंकल खन्ना(Twinkle Khanna).(Twinkle Khannna Off to london...Akshay Kumar revealed the reason behind that)

हेही वाचा: Koffe With karan 7: रणवीर सिंगचा राग-राग करतो टायगर श्रॉफ, करण समोर केलं कबूल

माहितीनुसार, लेखिका म्हणून आपली नवी कारर्किर्द एन्जॉय करणारी ट्विंकल खन्ना आता आयुष्यात एक नवीन इनिंग सुरु करतेय. ती आता फिक्शन रायटिंग मध्ये मास्टर डिग्री संपादित करण्यास सज्ज झालीय. त्यासाठी तिनं युनिव्हर्सिटीऑफ लंडनमध्ये प्रवेशही घेतला आहे.

अक्षय कुमार संपूर्ण कुटुंबासोबत म्हणजे पत्नी ट्विंकल,मुलगा आरव आणि मुलगी नितारा सोबत लंडनला रवाना झाला आहे. अक्षय याबाबतीत बोलताना म्हणाला आहे की,''लोक आपल्या मुलांना कॉलेजमध्ये सोडण्यासाठी जातात पण मी माझ्या पत्नीला लंडन युनिव्हर्सिटीत सोडायला चाललो आहे. कारण ती फिक्शन रायटिंगमध्ये मास्टर करत आहे. आणि त्यासाठी ती आता लंडनमध्येच आमच्यापासून दूर राहणार आहे''.

हेही वाचा: Boycott Brahmastra साठी मिळालं मोठं कारण, गोमांसविषयी बोलताना चुकलेलाच रणबीर

ट्विंकलनेही अभिनय क्षेत्राला रामराम केल्यानंतर जेव्हा लेखिका म्हणूनआपला नवा प्रवास सुरु केला तेव्हा तिनं काही चांगली पुस्तकं लिहिली आहेत. तिच्या Mrs.Funnybones,Pyjamas are Forgiving आणि The Legend Of Lakshmi Prasad या पुस्तकांना वाचकांनी दादही दिली.

अक्षय सध्या कुटुंबासोबत शॉर्ट ब्रेकवर आहे. आपला वाढदिवस तो लंडनमध्येच साजरा करणार आहेत. त्यानंतर तो भारतात परतेल,पण ट्विंकल मात्र आपला कोर्स पूर्ण करण्यासाठी लंडनमध्ये थांबणार आहे.

अक्षय कुमारच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर अक्षयची फिल्मी नौका सध्या हेलकावेच घेत आहे. त्याचे सिनेमे एकापाठोपाठ एक फ्लॉप होताना दिसत आहेत. यामध्ये 'बच्चन पांडे', 'पृथ्वीराज','रक्षाबंधन' सिनेमांचा समावेश आहे. आता अक्षयचा 'कठपुतली' सिनेमा २ सप्टेंबर रोजी OTT वर रिलीज होत आहे. याव्यतिरिक्त त्याच्याकडे 'रामसेतु','सेल्फी', 'Soorarai Pottru' चा हिंदी रीमेक,'OMG2' आणि 'Jolly LLB 3' असं सिनेमे हातात आहेत.

Web Title: Twinkle Khannna Off To Londonakshay Kumar Revealed The Reason Behind

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..