Big Boss Marathi 4: 'कानामागून आली अन् तिखट झाली...', स्नेहलतावर भडकली अमृता धोंगडे Snehlata Vasaikar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big Boss Marathi 4: Snehlata Vasaikar, Amruta Dhongade, Nomination Process

Big Boss Marathi 4: 'कानामागून आली अन् तिखट झाली...', स्नेहलतावर भडकली अमृता धोंगडे

Big Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉसनं सध्या सदस्यांवर विष - अमृत हे नॉमिनेशन कार्य सोपावलं आहे. या नॉमिनेशन कार्याच्या आधारे जो सदस्य पेटारा उघडून त्यातील विष मिळवेल तोच ठरवणार आहे विरोधी टीममधील कोणता सदस्य नॉमिनेट होईल. तसेच सदस्याला सुरक्षित देखील करण्याची पॉवर सदस्यांना दिली गेली. आणि याच टास्कमध्ये जिथे प्रसादने अमृता देशमुखला नॉमिनेट केले तिथे स्नेहलताने अमृता धोंगडे आणि अपूर्वामधून अमृता धोंगडेला नॉमिनेट केले. स्नेहलताने टास्क दरम्यान दिलेलं कारणं कुठेतरी अमृताला पटलं नाही अन् त्यावरनं अमृता भडकली. (Big Boss Marathi 4: Snehlata Vasaikar, Amruta Dhongade, Nomination Process)

हेही वाचा: Amitabh Bachchan: अमिताभला 'नॉटी' म्हणू लागलेयत लोक, एका फोटोनं उडवली खळबळ

अमृता धोंगडे आता यासंदर्भात तेजस्विनी समोर नाराजी व्यक्त करताना दिसणार आहे. आता नक्की तिच्या नाराजीचे काय कारण आहे हे आजच्या भागात कळेलच. काल अमृता देशमुख, अमृता धोंगडे, प्रसाद जवादे, विकास, त्रिशूल, किरण, समृध्दी घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले आहेत.

अमृता तेजस्विनीला म्हणाली, ''मला माहिती आहे माझी लीडरशिप क्वालिटी निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह लोकांना तुम्ही सपोर्ट करता आणि आम्हाला नाही करत याची काय गरज आहे तेजा''. यावर तेजस्विनी म्हणताना दिसणार आहे,''कुठे सपोर्ट करतो आहे, तिच्या निकषांवर ती पॉइंट ५ ने उजवी पडली''.

हेही वाचा: Charu Asopa: 'मी प्रेग्नेंट होते तेव्हा राजीवच्या बॅगेत मला...', चारु असोपाच्या आरोपानं खळबळ

तर, दुसरीकडे स्नेहलता अपूर्वा आणि अमृता देशमुख सोबत बोलताना दिसणार आहे. स्नेहलताचे म्हणणे आहे मला चुकीचे निर्णय नाही द्यायचे आहेत ज्याने एखादा नॉमिनेशन मध्ये येईल''.

हेही वाचा: Kantara: पाण्याच्या बॉट्ल्स विकल्या, हॉटेलमध्ये राबला... 'कांतारा'चा हिरो कसा बनला सुपरस्टार?

यावर अमृता देशमुख स्नेहलताला म्हणाली,''तुला आता जरी वाईट वाटत असेल तरी त्यांच्यासमोर बोलताना ठाम राहा, कारण ते हो हो म्हणत आहेत पण ते कधीही हा विषय काढतील..''. स्नेहलता पुढे म्हणताना दिसेल, ''निकष चुकला नव्हता ना ? फक्त मी मांडताना वाक्यरचना चुकली आहे''.

बघूया आता पुढे काय होईल ते आजच्या भागात. त्यासाठी पहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा.