Big Boss Marathi 3 : 'बिग बॉस मराठी' च्या चाहत्यांसाठी खुशखबर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

'बिग बॉस मराठी' च्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबर आहे. 'बिग बॉस मराठी' चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

मुंबई : 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोची लोकप्रियता भारतात सर्वाधिक आहे. हिंदीमध्ये त्याचं सध्या 13 वं सिझन सुरु आहे. अनेक भाषांमध्ये हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यातच मराठी भाषेमध्येही त्याचे दोन सिझन आले आणि त्य़ाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. 'बिग बॉस मराठी' च्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबर आहे. 'बिग बॉस मराठी' चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

अभिनंदन @shivthakare9 #BiggBossMarathi2 #ColorsMarathi

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

रोमांचक टास्क, गेम्स, भांडणे, लव्ह-अफेअर आणि महेश मांजरेकर यांचे सुत्रसंचालन हे सर्व म्हणजे 'बिग बॉस मराठी' ची खासियत आहे. 15 एप्रिल 2018 ला 'बिग बॉस मराठी' चं पहिलं पर्व सुरु झालं. या सिझनची विजेती मेघा धाडे ठरली. त्यानंतर दुसरं पर्वही आलं आणि शिव ठाकरे टॉफी बिग बॉसची ट्रॉफी जिंकला. त्यानंतर तिसऱ्या पर्वाची चाहते आतुयरतेने वाट पाहत होते. 

तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती 'राजश्री मराठी' ने आपल्या फेसबुक पेजवरुन ही माहिती दिली आहे. यामध्ये बिग बॉसचा मंच दिसत असून तिसरा सिझन लवकर सुरु होणार असल्याचं म्हणटलं आहे.

बिग बॉसच्या घराचं आणखी लएक वैशिष्ठ्य म्हणजे घराची थीम. प्रत्येक सिझनला त्यामध्ये काहीतरी वेगळेपण असतं आणि अनोखी थीम असते. तसंच यंदाच्या पर्वात अंतराळाची थीम ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, या माहितीने 'बिग बॉस मराठी' च्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या पर्वामध्ये कोण स्पर्धक असणार याचीही उत्सुकता आहे. हे सर्व जाणून घेण्यासाठी मात्र काही वेळ प्रतिक्षा करावीच लागेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big Boss Marathi season 3 coming soon