Sapna Chaudhari:सपना चौधरीचा रोमांस व्हिडिओ इंटरनेटवर वायरल.big boss sapna chaudhari romance video viral on social media | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big boss fem Sapna Chaudhari romantic video viral on social media

सपना चौधरीचा रोमांस व्हिडिओ इंटरनेटवर वायरल

आपली दमदार गाणी आणि डान्ससाठी सोशल मीडियावर चर्चेत असणारी हरियाणाची डान्सर सपना चौधरी कायम सोशल मीडियावर अॅक्टिव असते.बिग बॉस फेम सपना चौधरी नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.तीचे इन्स्टाग्रामवर लाखो फॅन्स आहेत.पायलने अलीकडेच तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला एक व्हिडिओ शेअर केलाय.सगळीकडे या व्हिडिओची चर्चा चाललेली दिसते.

सपना चौधरीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनलाय.या व्हिडीओमध्ये सपना चौधरी तिचा पती वीर साहूसोबत रोमांस करताना दिसत आहे.(Big Boss)या व्हिडिओमधे सपना चौधरीचा पती वीर साहू टेरेसवर एकटा उभा दिसतो.थोड्या वेळात मागून सपना येते.त्यानंतर त्यांचा रोमांस सुरू झालेला दिसतो.सूर्य मावळतानाच्या सीनमधील या त्यांच्या रोमँटिक व्हिडिओला चाहत्यांचीदेखील पसंती दिसून आली आहे.पायाखाली फुले,मावळतीचा सूर्य आणि दूरवरून दिसणारे डोंगर हे एकंदरीत प्रेक्षकांना आवडलेले दिसते.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झालेला दिसतो.सपना चौधरी अनेकदा अशे व्हिडिओ टाकत असते पण या रोमॅटिक व्हिडिओच्या माध्यामातून सपनाने तीचे पतीबाबत असलेले प्रेम उघडपणे मांडलेले दिसते.सपना चौधरीनं अशाप्रकारे पतीवर असलेल्या प्रेमाची उघडपणे कबुली देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिनं अनेकदा अशाप्रकारे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच तिनं पतीच्या नावाचा टॅटू हातावर गोंदवून घेतला आहे.

Web Title: Big Boss Sapna Chaudhari Romance Video Viral On Social

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top