
विकास गुप्ता बिग बॉसच्या चौदाव्या सिजनमुळे चांगलाच चर्चेत आहे.
मुंबई : बिग बॉसचा चौदावा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. नेहमीप्रमाणे या सिझनमध्ये देखील खेळाला रंगत आली आहे. या सिझनमधील रथी-महारथी आपापल्या पद्धतीने खेळात आपले वर्चस्व कायम ठेवण्याच्या प्रयत्नात पहिल्यापासूनच दिसून येत आहेत. आली गोनी, राहुल वैद्य, आर्शी खान, राखी सावंत आणि मास्टरमाईंड म्हणून ओळखला जाणारा विकास गुप्ता हे आणि असे अनेक खेळाडू सध्या बिग बॉसच्या रंगमंचावर हटके खेळी करत आहेत. मात्र, आता विकासला हा खेळ सोडावा लागणार आहे.
रश्मीचा सच्चा दोस्त विकास
विकास गुप्ता बिग बॉसच्या चौदाव्या सिजनमुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या बिग बॉस मधील खेळामुळे तो अनेक जणांना आवडत आहे. घरातील इतर सदस्यांसोबत झालेल्या भांडणामुळे काही दिवसांपूर्वी त्याची खास मैत्रीण रश्मी देसाई त्याला भेटायला देखील आली होती.
हेही वाचा - 'पीयुष मिश्रांमुळे सलमान खान झाला स्टार'
याआधीही विकास गेला होता घराबाहेर
आर्शी खानसोबत झालेल्या भांडणामुळे त्याने तिला स्वीमिंग पूल मध्ये ढकलले होते. त्यावेळी बिग बॉसच्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्याला घरातून बाहेर काढण्यात आले होते. घरात पुन्हा एन्ट्री घेऊन विकासने आर्शीसोबत पुन्हा मैत्री केली होती. राखी सावंतने विकासला भाऊ मानले होते. या भावा-बहिणीची जोडी खूप प्रसिद्ध झाली. कास्टींग डिरेक्टर असलेला विकास गुप्ता हा कलाकारांना काम न देता त्यांचे काम थांबवतो, असा आरोप आली गोनीने त्याच्यावर केला होता. पण हा आरोप फेटाळून लावत विकास आपल्या खेळाकडे लक्ष केंद्रित करत होता. घरातील अनेक सदस्यांनी विकासला टार्गेट केले होते. घराच्या कॅप्टन पदासाठी देखील विकासची निवड झाली होती.
मास्टरमाईंड पुन्हा घराबाहेर
'मास्टर माईंड' म्हणून ओळखला जाणाऱ्या विकास गुप्ताचे व्यक्तिगत आयुष्य खूप खडतर आहे. त्याच्या कौटुंबिक अडचणींमुळे तो बिग बॉसच्या घरात नेहमी अस्वस्थ राहत आहे. गेले काही दिवस विकास बीबी हाऊसमधील आपल्या खेळावर विशेष लक्ष देत होता. त्याच्या मास्टरमाईंड खेळीला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. विकास आपल्या मास्टरमाईंड डोक्याचा वापर करूनच बिग बॉसमधील सगळे टास्क खेळत आहे. पण अचानक त्याला शारीरिक त्रास होऊ लागला. त्यामुळे तो या आणि इतरही अनेक कारणांनी वारंवार रडताना दिसत होता. त्याला खूप त्रास होत आहे असे त्याने घरातील इतर सदस्यांना सांगितले होते. मात्र सध्या त्याला हा त्रास सहन होत नसल्याने बिग बॉसने त्याला घराबाहेर जाण्याची परवानगी दिली आहे. शारीरिक त्रासामुळे घराबाहेर जाणारा विकास हा बिग बॉस मधील दुसरा सदस्य ठरला आहे. या आधी मन्नू पंजाबी हा देखील शारीरिक त्रासाच्या कारणांनी घराबाहेर गेला होता.