
अनुराग कश्यपच्या टीममधील एक खास अभिनेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. मागील वर्षी त्यांची लिगल ईगल नावाची मालिका प्रदर्शित झाली होती.
मुंबई - वेगळ्या स्वभावाचे, व्यक्तिमत्वाचे आणि कुठल्याही चौकटीत अडकून न राहता सातत्यानं नवनवीन प्रयोग करणारे अभिनेते म्हणून पियुष मिश्रा यांचे नाव घेतले जाते.पीयुष मिश्रा यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटविणारे अभिनेते मिश्रा हे एक कवी आहेत. त्यांच्या काव्यवाचनाचे कार्यक्रमही तरुणाईमध्ये विशेष पसंतीचे आहेत. सोशल मीडियावर ते कायम अॅक्टिव्ह असतात.
मिश्रा यांनी एका इव्हेंटमध्ये आपल्या आजवरच्या चित्रपट कारकीर्दिला उजाळा दिला होता. त्यात पहिली मिळालेली संधी, ती नाकारल्यावर एका प्रसिध्द अभिनेत्याची झालेली इंट्री अशा अनेक गोष्टी त्यांनी त्यावेळी सांगितल्या. अनुराग कश्यपच्या टीममधील एक खास अभिनेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. मागील वर्षी त्यांची लिगल ईगल नावाची मालिका प्रदर्शित झाली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेत त्यांनी देशातील एका प्रसिध्द वकिलाची भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेसाठी ही मालिका कित्येकांनी पाहिली होती.
अनुराग कश्यपच्या गुलाल, गँग्ज ऑफ वासेपूर चित्रपटात त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्या बरोबर त्यांनी पिंक चित्रपटात केलेले कामही जाणकार प्रेक्षकांच्या लक्षात राहणारे होते. मिश्रा हे वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती देण्यासाठीही प्रसिध्द आहेत. त्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, आता जरी अनेक प्रसिध्द चित्रपट माझ्या वाट्याला आले असतील मात्र त्यावेळी मी मैंने प्यार किया सारखा चित्रपट नाकारला होता. 1989 मध्ये आलेल्या मैंने प्यार किया हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सलमानच्या करियरसाठी वळण घेणारी फिल्म होती. मात्र त्या भूमिकेसाठी पीयुष मिश्रा यांना ऑफर करण्यात आली होती. असे त्यांनी सांगितली.
जिया खानच्या आत्महत्येवर बीबीसीकडून ' डॉक्युमेंटरी' |
पीयुष मिश्रा यांनी 1988 मध्ये एका टीव्ही मालिकेच्या आधारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी भारत एक खोज नावाची मालिका प्रसिध्द झाली होती. त्यात त्यांनी भूमिका केली होती. त्यानंतर ते बराचकाळ लाईमलाईट पासून दूर राहिले होते. मिश्रा यांनी सांगितले की, सुरज बडजात्याने मला, सलमान खान आणि भाग्यश्रीला ऑडिशनसाठी बोलावले होते. सलमाननं जो रोल केला आहे तो मलाही ऑफर करण्यात आला होता. मी त्यावेळी तो रोल करण्याचा विचारच केला नाही.
ख्रिस्तोफर नोलानला भारताची ओढ; पुढचा चित्रपट बनवणार भारतात
त्यावेळी मी दिसायला चांगला होतो. राजकुमार बडजात्या यांनी आपलं कार्ड मला देत भेटायला सांगितले होते. त्यांनी राजकमल मंदिर येथे मला यायला सांगितलं होतं. पण मी गेलो नाही. त्याचे कारण काय हे आजपर्यत मला कळलेलं नाही. असेही मिश्रा यांनी यावेळी सांगितले.