
'बिग बॉस 16' लवकरच भेटीला; या तारखेला होणार सुरुवात?
बिग बॉस(Big boss) हा छोट्या पडद्यावरचा मोस्ट एंटरटेनिंग शो. गेली अनेक वर्ष या शो नं छोट्या पडद्यावरचं आपलं अस्तित्व अबाधित ठेवलं आहे. सलमान खान(Salman Khan) या बॉलीवूडच्या सुपरस्टारनं या शो च्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना आपल्याभोवतीच्या प्रसिद्धिच्या वलयामुळेही या शो ला एका वेगळया उंचीवर नेऊन ठेवलं आहे. म्हणजे सलमानशिवाय इतर कुणीतरी या शो चं सूत्रसंचाल केलं तर शो चा टीआरपी कितपत टिकून राहिल यात शंका आहे. त्यामुळे अर्थातच कळतंय की, येणाऱ्या 16 व्या सिझनचं सूत्रसंचालनही सलमान खानच करणार आहे. 'बिग बॉस सिझन 16' 2 ऑक्टोबरला सुरू होणार असून,शो ची वेळ 9 वाजताचीच असणार असल्याचं बोललं जात आहे. बिग बॉस या शो मधील टोकाच्या वादांमुळे अनेकांना हा शो आवडतही नाही पण तरिही या शो च्या चाहत्यांमध्ये मात्र दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यंदाचा सिझनही वादांमुळे,प्रेमप्रकरणामुळे,मैत्रीतील हेवेदाव्यांमुळे आणि अनेक कारणांनी गाजला खरा पण सिझ 13 इतका गाजला नाही असं बोललं जात आहे. सिझन 15 ची थीम जंगल होती, पण सिझन 16 च्या थीमबाबत मात्र गुप्तता राखण्यात आली आहे. (Bigg Boss News Updates)
हेही वाचा: Big boss: ट्रॉफी जिंकली नाही पण तरीही नशिब फळफळलं...कोणाचं?
आता आपल्याला उत्सुकता असेल की या सिझन 16 मध्ये कोणते सेलिब्रिटी भाग घेणार आहेत त्याबाबत. तर त्या लिस्टमधील काही नावं समोर आली आहेत जे 'बिग बॉस सिझन 16' च्या घरातील आगामी सदस्य असतील. सुरवातीला तेजस्वी प्रकाश,उमर रियाझ यांचं नाव समोर येतय ते सिझन 16 मधील वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी. त्यानंतर निधी भानुशाली,सनाया इरानी,रोनित रॉय,टिना दत्ता,मानव गोहिल,रीमा शेख,मनस्वी विशिष्ट,राकेश बापट,नेहा मलिक, अदा खान,अर्जुन बिजलानी,गुल्की जोशी,गेवी चहल,पार्थ समथान,सुरुभी चंदना,शाहिर शेख,सिझेन खान अशा बिग बॉस 16 मधील संभाव्य स्पर्धकांची नावं समोर आली आहेत. आता लवकरच कळेल यापैकी किती जणांच्या नाववार शिक्कामोर्तब होत आहे ते. कारण बिग बॉसच्या घरात सदस्य म्हणून नेमणूक होण्यासाठी या कलाकारांना काही टास्कना सामोरं जावं लागेल ज्यामधून अंतिम सदस्यांची निवड होईल. यंदाचा सिझन फारसा चालला नाही असं बोललं जात असल्यामुळे मेकर्स सिझन 16 साठी जोरदार तयारी,नवनवीन आयडियाजवर काम करत असल्याचं बोललं जात आहे. या नावांवर अदयाप शिक्कामोर्तब झालं नसल्यानं कदाचित इतरही सदस्य बिग बॉस 16 च्या सिझनमध्ये दिसू शकतील.
Web Title: Big Boss Season 16 Will Start Very Soonreadentertainment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..