'जीम' नाही तर 'हा' आहे बिग बॉस विनर विशाल निकमचा वर्कआऊट अड्डा!. Vishal Nikam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vishal Nikam

'जीम' नाही तर 'हा' आहे बिग बॉस विनर विशाल निकमचा वर्कआऊट अड्डा!

'मराठी बिग बॉस सिझन 3'(Marathi Big boss 3) चा विनर ठरलाय विशाल निकम(Vishal Nikam). सांगली जिल्हयातल्या छोट्याशा देवीखिंडी गावातून आलेला विशाल जसा आहे तसा खरा माणूस बनून शेवटपर्यंत बिग बॉसच्या घरात राहिला म्हणूनच इतर तगड्या सोळा स्पर्धकांसमोर त्याचा टिकाव लागला असं सगळीकडे सध्या बोललं जातंय. अर्थात आपल्या मुलाखतींमधूनही विशाल निकम तेच बोलतोय. विशाल बिग बॉसच्या घरात असताना नेहमीच आपल्या गावाकडच्या गप्पागोष्टी करताना दिसायचा. 'गावाकडची माती','मातीतला माणूस' हे शब्द तर हमखास त्याच्या बोलण्यात अनेकदा यायचे. १०० दिवस बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर बाहेर आलेल्या विशालनं सुरुवातीला आपलं गावच गाठलं. आता तर त्यानं गावातल्या एका विशेष जागेचा म्हणजे त्याच्या भाषेत एका अड्ड्याचा व्हिडीओ शेअर केलाय. जो व्हिडीओ पाहून चाहतेही त्याच्यावर भारी खूश झालेयत.

हेही वाचा: विराट-अनुष्काचं चाहत्यांना न्यू ईयर गिफ्ट;मुलीचा व्हिडीओ केला शेअर

विशालची पर्सनॅलिटी खरं तर आकर्षक म्हणायला हवी. त्यानं कमावलेली बिल्ड बिग बॉस शो पाहताना इतर स्पर्धकातून त्याच्यावर नजर हमखास न्यायची. अर्थात बिग बॉसमध्ये येण्याआधी 'दख्खनचा राजा-ज्योतिबा' या आपल्या मालिकेतनंच त्यानं आपल्या पिळदार शरीरयष्टीचं दर्शन घडवलं होतं. पण यासाठी त्यानं चांगल्या जीममध्ये वगैरे ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली ती बिल्ड कमावली असेल असा सर्वसाधारण समज असणार आपल्या सगळ्यांचा . पण असं काही नाही बरं का. आपल्या या साध्या माणसानं ही बिल्ड कमावलीय ती गावातल्या एका विशिष्ट माळरान जागेवर वर्कआऊट करून. ना तिथे कुठला एसी,प्लेन फ्लोअर ना कुठलेही इन्स्ट्रुमेन्ट. व्हिडीओ पहा म्हणजे कळेल की त्याचे इन्स्ट्रुमेन्ट नेमके काय होते ते.

विशाल निकमनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गावातील त्याच्या वर्कआऊट अड्ड्याचा व्हिडीओ इथे शेअर केलाय. आपल्याला व्यायाम करूनही दाखवलाय.

विशाल आपल्या गावातील एका माळरानावर वर्कआऊट करताना या व्हिडीओत दिसेल. जिथं केवळ त्याने आपल्या वर्कआऊट अड्ड्याची ओळख करून दिली नाही तर चक्क त्या खडकाळ जागेत अशक्य वाटणारा व्यायामही करून दाखवला. बरं हे तो आधीपासनं करत आलाय. 'खडक' हेच त्याचे इन्स्ट्रुमेन्ट्स असं या व्हिडीओतनं तरी स्पष्ट दिसतंय. त्यांच्याच मदतीनं या खडकाळ माळरानावर कमावलेल्या सिक्स पॅक अॅब्जमुळे त्याची कमालच म्हणावी लागेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top